उद्यापासून बदलणार ‘हे’ ५ नियम


उद्यापासून म्हणजेच १ डिसेंबरपासून अनेक नियम बदलणार आहेत. एलपीजी सिलेंडरची किंमत, होम लोन ऑफर, एसबीआय क्रेडिट कार्ड ऑफर, आधार-यूएएन लिंकिंग इत्यादींचा या बदलांमध्ये समावेश आहे. प्रत्येक नवीन महिन्याच्या पहिल्या तारखेला किंवा जुन्या नियमांमध्ये काही बदलांसह काही नवीन नियम लागू होतात.

UAN-आधार लिंकिंग
तुम्ही जर नोकरी करत असाल आणि तुमच्याकडे युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN), तर ३० नोव्हेंबरपर्यंत आधार क्रमांकाशी लिंक करा. कंपन्यांना १ डिसेंबर २०२१ पासून, फक्त अशाच कर्मचाऱ्यांचे ECR दाखल करण्यास सांगितले आहे ज्यांचे UAN आणि आधार लिंकिंग सत्यापित झाले आहे. उद्यापर्यंत जे कर्मचारी ही लिंक दाखल करू शकणार नाहीत, ते ECR देखील दाखल करू शकणार नाहीत.

गृह कर्ज ऑफर
बहुतेक बँकांनी सणासुदीच्या काळात गृहकर्जाच्या विविध ऑफर दिल्या होत्या, ज्यात प्रक्रिया शुल्क माफी आणि कमी व्याजदर यांचा समावेश होता. ३१ डिसेंबर रोजी बहुतांश बँकांच्या ऑफर संपत आहेत. परंतु यात एलआयसी हाऊसिंग फायनान्स ऑफर ही ३० नोव्हेंबरला म्हणजे आज संपत आहे.

एसबीआय क्रेडिट कार्ड
जर एसबीआय क्रेडिट कार्ड तुम्ही वापरत असाल, तर 1 डिसेंबरपासून एसबीआयच्या क्रेडिट कार्डने ईएमआयवर खरेदी करणे महाग होणार आहे. एसबीआय कार्ड वापरल्यावर फक्त व्याज भरावे लागणार होते, पण १ डिसेंबरपासून प्रोसेसिंग फी देखील भरावी लागणार आहे.

घरगुती गॅस सिलेंडरची किंमत
गॅस सिलेंडरच्या किमती प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला निश्चित केल्या जातात. व्यावसायिक आणि घरगुती सिलेंडरचे नवीन दर महिन्याच्या पहिल्या दिवशी जारी केले जातात. नवीन दर १ डिसेंबरला सकाळी जाहीर केले जातील.

जीवन प्रमाणपत्र
जर पेन्शनधारकांच्या श्रेणीत तुम्ही देखील येत असाल तर तुमच्याकडे २ दिवस शिल्लक आहेत. आज किंवा उद्या या दोन दिवसांत पेन्शनधारकांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे अन्यथा १ डिसेंबरपासून तुम्हाला पेन्शन मिळणे बंद होईल.