महाराणी एलिझाबेथ मोबाईलवरून फक्त या दोन लोकांशी करते संवाद

ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीय सॅमसंग कंपनीचा मोबाईल वापरते आणि हा फोन अँटी हॅकर एन्क्रीप्शन सुविधेसह आहे. त्यामुळे राणीचा फोन हॅक करणे हे सोपे काम नाही. जगातील प्रभावशाली व्यक्ती मध्ये समावेश असलेल्या महाराणी एलिझाबेथ ९५ वर्षांच्या आहेत आणि त्या सोशल मिडीयावर चांगल्याच सक्रीय आहेत. शाही परिवारासंबंधित बातम्या कव्हर करणारे पत्रकार जोनाथन रॉक्सडोटी यांनी महाराणी आणि त्यांचा मोबाईल यासंबंधी काही माहिती दिली आहे.

जोनाथन सांगतात, महाराणी एलिझाबेथ फक्त दोन लोकांशी मोबाईलवरून बोलतात आणि जगात कुठेही असल्या तरी या दोघांपैकी कुणाचाही फोन आला तरी त्याला त्वरित उत्तर देतात. त्यात महाराणीच्या मुलाचा समावेश नाही. एलिझाबेथ त्यांची कन्या राजकुमारी अॅनी आणि रेसिंग मॅनेजर जोन वॉरेन यांच्या कॉलनाच फक्र्त उत्तर देतात. रेसिंग मॅनेजर जोन, राणीच्या मित्राचे जावई आहेत. वॉरेन राणीच्या ब्लडस्टॉक व रेसिंग अॅडव्हायझर या प्रतिष्टीत पदावर नियुक्त आहेत.

महाराणी एलिझाबेथ यांच्या संबधी असेही सांगितले जाते कि राणीकडे स्वतःचा पासपोर्ट नाही. पण जगभर त्या कुठेही प्रवास करू शकतात. तसेच त्यांच्याकडे वाहन चालक परवाना नाही. मात्र ब्रिटन मध्ये कुठेही वाहन चालविण्यासाठी त्यांना परवान्याची गरज नाही.