वॅक्सिन ठरला ‘ वर्ड ऑफ द ईयर’

करोना काळात जगभरातील सर्व नागरिकांना एकाच गोष्टीची आवश्यकता होती ती करोना लसीची. संशोधकांनी या साठी वेगवान संशोधन केले आणि आज जगात अनेक देशांनी करोना लस तयार केली आहे ज्यामुळे अनेक करोना रुग्णांचे प्राण वाचत आहेत. याच मुळे २०२१ वर्षासाठी मरियम वेब्स्टर डिक्शनरीने ‘वॅक्सिन’ या शब्दाची ‘वर्ड ऑफ द ईयर’ म्हणून निवड केली आहे.

मरियम वेब्स्टरचे एडिटर पीटर सोकोलोवस्की या संबंधी माहिती देताना म्हणाले वॅक्सिन या शब्दचा आपल्या सर्वांच्या जीवनात या वर्षात सर्वाधिक वेळा वापर केला गेला. या शब्दाच्या दोन कथा आहेत. त्यातील एक विज्ञानाशी संबंधित आहे तर दुसरी लसीचे राजकारण याच्याशी संबंधित आहे. विज्ञान म्हणजे ज्या गतीने कोविड १९ लसी तयार केल्या गेल्या ती कथा आणि दुसरी लसीचे राजकारण आणि त्यावरून झालेल्या चर्चा.

ऑक्सफर्ड प्रकाशित करणाऱ्या लोकांनी या वर्षी ‘वॅक्स’ या शब्दची सर्वाधिक वापर झालेला शब्द म्हणून निवड केली कारण ऑनलाईन वर हा शब्द सर्वाधिक वेळा सर्च केला गेला होता. मारियान वेब्स्टरने गतवर्षी ‘पँडामिक’ शब्दाची सर्वाधिक सर्च झालेला शब्द म्हणून निवड केली होती मात्र या वर्षी तो शब्द मागे पडला आणि वॅक्सिन हा शब्द सर्वाधिक सर्च केला गेला. अमेरिकेत डिसेंबर मध्ये कोविड लसीचा पहिला डोस दिला गेला आणि वॅक्सिन शब्द सर्च करण्याचे प्रमाण ६०१ टक्के वाढले.

२०१९ मध्ये लसीबाबत कमी चर्चा झाली त्या तुलनेत यंदा वॅक्सिन सर्च करण्यात १०४८ टक्के वाढ झाल्याचे दिसून आले. लसीचे असमान वितरण, लसीची गरज, बुस्टर वाद, लसीबाबत लोकांच्या मनात असलेली भीती, शंका यामुळे वॅक्सिन शब्द मोठा प्रमाणवर सर्च केला गेला असे पीटर सोकोलोवस्की यांचे म्हणणे आहे.