लियोनेल मेस्सी यंदाचा ‘बेलोन डी’ओर २०२१’ विजेता
अर्जेन्टिना व पॅरीस सेंट जर्मेनचा स्टार खेळाडू लियोनेल मेस्सी यंदाचा ‘बेलोन डी’ओर’ विजेता निवडला गेला आहे. रेकॉर्ड सातव्या वेळी मेस्सीची या सन्मानासाठी निवड झाली आहे. ३४ वर्षीय मेस्सीने पोर्तुगाल चा स्टार खेळाडू क्रिस्तियानो रोनाल्डो आणि बायर्न म्युनिखचा स्टार रोबर्ट लिवानडोस्की यांना मागे टाकून हा सन्मान मिळविला आहे.
यावर्षी मेस्सी साठी हा पुरस्कार खास आहे कारण याच वर्षात त्याला स्पॅनिश क्लब बार्सिलोना सोडावा लागला. गेली १५ वर्षे मेस्सी या क्लबशी जोडलेला होता. आता फ्रेंच क्लब पॅरीस सेंट जर्मेन बरोबर मेस्सीचा करार झाला आहे. २०१९ मध्ये मेस्सीने सहाव्या वेळी हा पुरस्कार मिळविला होता आणि २०२० मध्ये करोना मुळे हा पुरस्कार दिला गेला नव्हता. या वर्षी तो पुन्हा सुरु झाला.
हा पुरस्कार फ्रांस फुटबॉल पत्रिका बेलोन डी’ओर तर्फे दरवर्षी दिला जातो. क्लब आणि राष्ट्रीय टीम मध्ये एका वर्षात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूची त्यासाठी निवड केली जाते. १९५६ साली प्रथम हा पुरस्कार स्टेनली मॅथ्युस याला दिला गेला होता. २०१८ पासून सर्वोत्कृष्ट महिला फुटबॉल खेळाडू साठी हा पुरस्कार देण्यास सुरवात झाली. यावर्षी पुरस्काराचे ६५ वे वर्ष आहे. सर्वाधिक म्हणजे सात वेळा मेस्सीने हा पुरस्कार मिळविला असून त्याच्यामागे क्रिस्तियानो रोनाल्डो याने पाच वेळा हा पुरस्कार मिळविला आहे.