राज्यातील बँकांमध्ये डिसेंबर महिन्यात एवढे दिवसच होणार व्यवहार


मुंबई – तुमचे बँकशी संबंधित काही महत्त्वाचे काम असल्यास आधीच त्याचे नियोजन करा, कारण डिसेंबर महिन्यात राज्यातील बँकांना ६ दिवस सुट्टी असणार आहे. या दिवसात तुमच्या कामाचा खोळंबा होऊ नये, म्हणून आम्ही सुट्ट्यांची यादी देत आहोत. आरबीआयने म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून नुकतीच बँक सुट्ट्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. प्रत्येक राज्यात संपूर्ण डिसेंबर महिन्यात किती सुट्ट्या आहेत, हे, या यादीत जाहीर केलेले आहे. प्रत्येक राज्यातील सणांनुसार बँका बंद राहतात. त्यामुळे त्यानुसार योजना आखूनच तुम्ही बँकेमध्ये जा. विविध बँकांची कामे कोरोना काळात ऑनलाइन सुरू आहे. ऑनलाइन प्रणालीचा वापर ग्राहकांनी देखील त्यांच्या दैनंदिन बँकिंग कामासाठी करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान तरी देखील तुम्हाला काही आवश्यक कामासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता असेल तर बँकाच्या सुट्ट्या तपासूनच बँकेला भेट द्या.

ही आहे सुट्ट्यांची यादी

  • ५ डिसेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
  • ११ डिसेंबर – शनिवार (महिन्याचा दुसरा शनिवार)
  • १२ डिसेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
  • १९ डिसेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
  • २५ डिसेंबर – ख्रिसमस (बंगळुरू आणि भुवनेश्वर वगळता सर्व ठिकाणी बँका बंद) शनिवार, (महिन्याचा चौथा शनिवार)
  • २६ डिसेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)