डोंबिवलीमध्ये आढळला ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण! 8 दिवस लक्ष ठेवणार पालिका


मुंबई : दक्षिण अफ्रिकेवरुन आलेल्या मुंबईपासून काहीच अंतरावर असणाऱ्या डोंबिवलीमधील एका रहिवाश्याला कोरोनाची लागण झाल्याची स्पष्ट माहिती समोर आली आहे. या माहितीमुळे राज्यभर खळबळ उडाली आहे. ज्या देशांमध्ये ‘ओमिक्रॉन’ हा नवा व्हेरिएंट पसरला आहे. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण हे दक्षिण आफ्रिकेतच असल्यामुळे या प्रवाशाला नवीन प्रकारच्या घातक व्हेरिएंटची लागण झालेली नाही ना याची सध्या खातरजमा करुन घेतली जात आहे.

दुसरीकडे ‘ओमिक्रॉन’ संदर्भातील महत्वाची घोषणा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. डोंबिवलीमध्ये आफ्रिकेतून आलेल्या कोरोनाबाधित व्यक्तीची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती राजेश टोपेंनी दिली आहे. तसेच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळावर या देशांतून येणाऱ्या विमानांना बंदी घालावी, याबाबतचा निर्णय राज्याने घ्यावा का याबाबत देखील चर्चा झाल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

आज डोंबिवलीमध्ये आफ्रिकेतून आलेल्या व्यक्तीची तब्बेत चांगली असून ही व्यक्ती पॉझिटीव्ह आढळून आली आहे. त्यांच्यामधील जिनोमिक सिक्वेन्सींगसाठी स्वॅब पाठण्यात आला आहे. लवकरच याबाबतची माहिती प्राप्त होईल तसेच या प्रकरणाकडे विशेष लक्ष ठेवले जात असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

डोंबिवलीत आफ्रिकेतून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णाचे अहवाल जनुकीय गुणसूत्र तपासणीसाठी मुंबईच्या प्रयोगशाळेत पाठविले आहेत. सात दिवसांमध्ये यासंदर्भातील अहवाल मिळेल. या रुग्णावर तोपर्यंत पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे लक्ष असणार आहे. पालिका कर्मचाऱ्यांकडून त्याच्या उपचारांसंदर्भातील सर्व माहिती आणि तपशील वेळोवेळी तपासला जाईल, असे यामधून स्पष्ट होत असल्याची माहिती कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दिली आहे.