मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये नवा खुलासा; जॅकलिन सुकेशसोबत होती रिलेशनशीपमध्ये ?


मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. जॅकलीन फर्नांडिस मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीच्या रडारवर सापडल्यामुळे या चर्चा सुरु झाल्या होत्या. ईडीकडून २०० कोटी रुपयांच्या मनी लॉऩ्ड्रिंग प्रकरणात जॅकलिनची जवळपास ८ तास चौकशी झाली होती. सुकेश चंद्रशेखरचे वकील यांनी २३ ऑक्टोबर रोजी खुलासा केला होता की तुरुंगात असलेल्या सुकेशसोबत जॅकलीन रिलेशनशिपमध्ये होती. आता, जॅकलिनचा सुकेशसोबतचा एक फोटो समोर आला आहे.

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तपास सुरु असताना जॅकलीन आणि सुकेश यांचा एक फोटो समोर आला आहे.सर्वात आश्चर्यकारक बाब ही आहे की सुकेश जामिनावर तिहारमधून बाहेर आला तेव्हाचा हा फोटो आहे. तो जामीन मिळाल्यानंतर चेन्नईला गेला होता. सध्या व्हायरल होणारा फोटो देखील चेन्नईच्या एका हॉटेलमधील आहे.


सुकेशच्या हातात फोटोमध्ये फोन दिसत आहे. या फोनमध्येच इस्रायलचे सीम कार्ड टाकून २०० कोटी वसूल केले होते. सुकेशला जामीन मंजुर झालानंतरही हा फोन तो वापरत होता. पण या फोटोमध्ये जॅकलिन असल्यामुळे सध्या चर्चेत आहे. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिहार कारागृहातून २०० कोटी रुपये वसूल करणारा सुकेश चंद्रशेखर स्वत:ची खरी ओळख न सांगता जॅकलिनला फोन करत असे. तो स्पूफिंगद्वारे तिहार जेलमधून जॅकलिनला फोन करत असल्याचे म्हटले जात आहे. जॅकलिनला त्याने काही महागाड्या भेटवस्तू देखील गिफ्ट म्हणून पाठवल्या होत्या. पण चौकशीदरम्यान जॅकलिनने तिला भेटवस्तू पाठवणारी आणि फोन करणारी व्यक्ती जेलमध्ये असल्याची तिला कल्पना देखील नसल्याचे जॅकलिन म्हणाली होती.