कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर मोदींनी बोलवली उच्चस्तरीय बैठक


नवी दिल्ली – दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटमुळे जगभरात पुन्हा एकदा भितीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट अधिक धोकादायक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. अमेरिकासह अनेक देशांनी हा धोका लक्षात घेता प्रवासावरील निर्बंध वाढवले आहेत. याबाबत भारत सरकारही निर्णय घेणार असल्याचे वृत्त आहे. डीजीसीए याबाबत आज शनिवारी एक बैठक घेणार आहे. यामध्ये नवीन व्हेरिएंट आढळलेल्या देशातून येणाऱ्या विमानप्रवासावर निर्बंध अथवा या देशातून येणाऱ्या प्रवाशांना 14 दिवसांचे क्वारंटाईन बंधनकारक करण्यावर निर्णय घेतला जाऊ शकतो.

दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे भय वाढत चाललेलं असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्वाची बैठक बोलवली आहे. डेल्टापेक्षाही जास्त भयंकर असा हा व्हेरिएंट मानला जात असल्यामुळे तातडीने उपाययोजनांवर या बैठकीत चर्चा होणार आहे.

नवीन व्हेरिएंट आढळलेल्या दक्षिण आफ्रिका, युरोप, हाँगकाँगवरुन फ्लाइट भारतात येत आहेत. याबाबत डीजीसीए आज बैठक घेणार आहे. या बैठकीत विमानप्रवासावर बंधने अथवा येथून येणाऱ्या प्रवाशांना 14 दिवसांचं क्वारंटाइन बंधनकारक करण्यात येऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.

जगभरात कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटमुळे चिंतेचे वातावरण असल्यामुळे जगभरातील अनेक देशात प्रवासावर बंधन लावण्यात आली आह. अनेक देशांनी दक्षिण आफ्रिकामधून येणाऱ्या विमानप्रवासावर बंधन लावली आहेत. यामध्ये इटली, ऑस्ट्रिया, फ्रांस, जापान, यूनाइटेड किंगडम, सिंगापुर, नेदरलँड, माल्टा, मलेशिया, मोरक्को, फिलीपींस, दुबई, जॉर्डन, अमेरिका, कनाडा आणि तुर्की या देशांचा समावेश आहे. भारत याबाबत आज निर्णय घेण्याची शक्यता आहे.

कोरोनाचा नवीन व्हेरिएंट लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांमध्येही आढळल्यामुळे जगभरात चिंतेचे आणि भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. युरोपमधील परिस्थितीने आधीच जगाची चिंता वाढवली होती. त्यात दक्षिण आफ्रिकामध्ये आढळलेल्या नवीन व्हेरिएंटने भर टाकली आहे. लसीकरण झालेल्या लोकांमध्येही कोरोनाचा नवीन व्हेरिएंट आढळला आहे. त्यातच संशोधकांनी हा नवीन व्हेरिएंट म्युटेट होऊ शकतो आणि अधिक वेगाने प्रसारीत कऱण्याची क्षमता असल्याचेही सांगितले आहे.