अखेर फातिमाने सोडले आमिरसोबत लग्नाच्या चर्चांवर मौन


मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून बॉलिवूडमध्ये अभिनेता आमिर खान ओळखला जातो. आमिरचे लाखो चाहते आहेत. आमिर त्यांच्या खासगी आयुष्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्याचा आणि किरण रावचा काही महिन्यांपूर्वी घटस्फोट झाला. त्यानंतर आता आमिर तिसरे लग्न अभिनेत्री फातिमा सना शेखसोबत करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. दरम्यान, यावर आता फातिमाने प्रतिक्रिया दिली आहे.

आपला आगामी ‘लाल सिंग चढ्ढा’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आमिर त्याच्या तिसऱ्या लग्नाची घोषणा करणार असल्याचे जाते. पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे. तो त्यानंतर लग्नाची घोषणा करणार आहे. याच कारण म्हणजे प्रेक्षकांचे लक्ष हे त्याच्या लग्नावर असेल आणि चित्रपटावर नाही, असे म्हटले जाते.

आमिर हा गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री फातिमा सना शेखसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु आहेत. आता फातिमाने त्यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आमिर आणि तिच्या लग्नाच्या बातम्यांविषयी फातिमाला विचारता ती म्हणाली, माझ्यासाठी हे सगळे खूप विचित्र आहे. माझी आई जेव्हा जेव्हा हे सगळे टीव्हीवर पाहायची, तेव्हा तिला खुप दु:ख होत होते. वर्तमानपत्रात माझा फोटो आला की, तिला खूप आनंद व्हायचा, पण जेव्हा ती अशा हेडलाईन वाचते, तेव्हा तिला फार वाईट वाटायचे. माझ्याबद्दलच्या त्या सगळ्या गोष्टी ऐकून मलाही त्रास झाला आहे. त्यानंतर मी विचार केला की आता मला माझे बोलणे सगळ्यांसमोर मांडण्याची गरज आहे.