अनिल कपूरच्या तब्येतीमुळे चाहते काळजीत
बॉलीवूड मधला सदाबहार अभिनेता अनिल कपूर याने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला असून त्यामुळे त्याच्या चाहत्यांना अनिल कपूरच्या तब्येतीबद्दल चिंता लागली आहे. अनिल कपूरने हा व्हिडीओ जर्मनी मधून शेअर केला आहे. त्यात तो जर्मनीतील बर्फ पडत असलेल्या रस्त्यांवरून काळा कोट, कॅप घालून चालताना दिसतो आहे. कॅप्शन मध्ये अनिलने, जर्मनीत स्नोवर एक परफेक्ट वॉक असे लिहून त्याखाली जर्मनीतील शेवटचा दिवस, डॉ. मुल्लर यांच्या भेटीला चाललो आहे. त्यांच्या जादूई स्पर्शाबद्दल आभारी आहे असे म्हटले आहे.
कोणता आजार, कसली ट्रीटमेंट याचा काहीच उल्लेख नसल्याने अनिल कपूरचे चाहते चिंतेत पडले आहेत. आजार फार गंभीर नाही ना या काळजीने त्यांना व्यापले आहे. सोशल मिडीयावर अनिल कपूरला नक्की काय झाले याची विचारणा होत आहे. सर्वसाधारण पणे आजार गंभीर असेल तरच परदेशात उपचार केले जातात म्हणून हि चौकशी होत आहे.
२०१९ मध्ये अनिल उजव्या खांद्याच्या दुखण्याने हैराण होता. तेव्हाही त्याने जर्मनीत डॉ. हॅन्स मुल्लर यांच्या कडेच उपचार घेतले होते. मुल्लर सेलेब्रिटी स्पोर्ट्स डॉक्टर असून ते सध्या जर्मनीच्या फुटबॉल टीम बरोबर काम करत आहेत. त्यांच्या क्लायंटमध्ये धावपटू उसेन बोल्ट, टेनिस खेळाडू बोरिस बेकर यांची नावे आहेत.