अमल महाडिकांनी अर्ज मागे घेतल्यामुळे सतेज पाटील यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा


कोल्हापूर – अखेर कोल्हापूर विधान परिषद बिनविरोध करण्यावर शिक्कामोर्तब झाले असून आज भाजप उमेदवार अमल महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता, पक्ष श्रेष्ठींच्या निर्देशप्रमाणे अमल महाडिक हे आपल्या समर्थकांसह आज जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज मागे घेण्यासाठी पोहचले होते.

अमल महाडिक यांना निवडणूक रिंगणातून माघार घेण्याचे निर्देश भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठांकडून आल्यामुळे महाडिक यांनी पक्षाचा आदेश मान्य करत अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आता कोल्हापूर विधान परिषद निवडणूक ही बिनविरोध होत आहे. काँग्रेसचे उमेदवार व पालकमंकत्री सतेज पाटील यांची कोल्हापूर विधान परिषद निवडणुकीत आता बिनविरोध निवड होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.