८३ चा नवा अंगावर शहारे आणणारा टीझर तुमच्या भेटीला


भारतीय संघाने २५ जून १९८३ रोजी लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. याच विजयगाथेवर आधारित आगामी ’८३’ हा चित्रपट आहे. अभिनेता रणवीर सिंग या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. अशातच आता चित्रपटाचा नवा टीझर रिलीज करण्यात आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ’83’ चित्रपटाचा टीझर रणवीर सिंगने शेअर केला आहे. ५९ सेकंदाच्या टीझरमध्ये १९८३ साली झालेल्या लंडनमधील लॉर्ड्स मैदानातील भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामना दाखवण्यात आला आहे. तसेच हा सामना पाहाण्यासाठी चाहत्यांनी केलेली गर्दी दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर चित्रपटाचा टीझर व्हायरल झाला असून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भारतीय संघाने लॉर्ड्स मैदानात रचलेला इतिहास पुन्हा नव्याने जाणून घेण्याची संधी या चित्रपटाद्वारे मिळणार आहे.


रणवीरने चित्रपटाचा टीझर शेअर करत, ही आतापर्यंतची सर्वांत चांगली कथा आहे. हा चित्रपट २४ डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नडा या भाषांमध्ये रिलीज होणार असल्याचे कॅप्शन दिले आहे.

दरम्यामन हा चित्रपट यापूर्वी ४ जून २०२१ रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार होता. रणवीरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली होती. पण कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली.

’83’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा चित्रपट दिग्दर्शक कबीर खान सांभाळली आहे. चित्रपटाच्या टीममध्ये रणवीर सिंग, एमी विर्क, चिराग पाटील ,साकीब सलीम ,ताहिर भसीन ,जतिन सरना ,जीवा, आदिनाथ कोठारे, साहिल खट्टर,पंकज त्रिपाठी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. तसेच अभिनेत्री दीपिका पादूकोण कपिल देव यांच्या पत्नी रोमी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.