ड्रामा क्वीन राखी सावंतची इतकी आहे संपत्ती
बॉलीवूड मध्ये ड्रामा क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली राखी सावंत नित्यनेमाने काही बोल्ड, वादग्रस्त आणि अजब विधाने करून प्रसिद्धीच्या झोतात राहते. अर्थात त्यामुळे तिला फार सिरीयसली कुणी घेत नाही. मात्र तरीही तिचा चाहता वर्ग मोठा आहे. अश्या या राखीचा वाढदिवस २५ नोव्हेंबरला साजरा झाला.
राखीला ड्रामा क्वीन म्हणणारे तिला फारसे गंभीरपणे घेत नाहीत हे खरे असले तरी ते चुकीचे आहे. कारण राखीची उपस्थिती सुद्धा मोठा फरक घडवून आणू शकते याचा प्रत्यय आज लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या बिग बॉस कार्यक्रमात आला आहे. ज्यावेळी या बिग बॉसचा टीआरपी काहीच नव्हता म्हणजे त्याची हालत खराब होती तेव्हा या बोल्ड अभिनेत्रीने त्यावेळी हा कार्यक्रम एक हाती लोकप्रिय करून दाखविला आहे.
नृत्य, अभिनय आणि ड्रामा अश्या अनेक कला अवगत असलेली राखी स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल फार बोलत नाही. मात्र तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इंडिया डॉट कॉम वर एक रिपोर्ट आला असून त्यात राखीची संपत्ती ३७ कोटी इतकी असल्याचे म्हटले आहे. राखीच्या नावे ११ कोटी रुपये किमतीचा अलिशान बंगला आहे. महागड्या गाड्याची तिला आवड असून तिच्याकडे पोलो कार व फोर्ड एन्डेव्हर आहेत. मुंबईच्या पॉश जुहू, अंधेरी भागात तिचे दोन फ्लॅटस आहेत. राखीचे खरे नाव नीरु भेडा असे असून बॉलीवूड साठी तिने राखी सावंत हे नाव घेतले आहे.