चीनी ओप्पोने भारतात केला पहिला फाईव्ह जी कॉल

चीनी स्मार्टफोन कंपनी ओप्पोने मोठे यश मिळविले असून गुरुवारी हैद्राबादच्या ‘की साईट सोल्युशन’ च्या फाईव्ह जी प्रयोगशाळेत पहिला फाईव्ह जी व्हीओएनआर (व्हॉईस/व्हीडीओ ऑन न्यू रेडीओ )कॉल यशस्वी रित्या केला. कंपनीच्या लेटेस्ट रेनो ६ स्मार्टफोनवरून केल्या गेलेल्या या कॉलसाठी एंड टू एंड स्टँड अलोन नेटवर्कचा वापर केला गेला.

ओप्पोचे भारतातील आर अँड डी प्रमुख तस्लीम आरिफ यांनी त्यांची टीम फाईव जी तंत्रज्ञानावर काम करत असल्याचे सांगितले. ते म्हणाले, यामुळे भारतीय युजर्सना चांगल्या फाईव्ह जी तंत्रज्ञानाचा अनुभव मिळेल. व्हीओएनआर एक व्हॉईस ओव्हर फाईव्ह जी न्यू रेडीओ कॉल असून त्यात फाईव्ह जी च्या नेटवर्कच्या एसए आर्क्टिटेक्चरचा वापर होतो. यामुळे चांगला आवाज आणि व्हिडीओ मिळतो. एसए नेटवर्क फाईव्ह जी नेटवर्कच्या एसए आर्कीटेक्चर मधले प्राथमिक आर्कीटेक्चर असून जगभरातील ऑपरेटर त्यावर फाईव्ह जी टेस्टिंग करत आहेत असे समजते.

दरम्यात टेलिकॉम कंपनी एअरटेलने नोकिया सह ७०० एमएचझेड बँडवर फाईव्ह जी ट्रायल केली असून ही चाचणी कोलकाताच्या बाहेरच्या क्षेत्रात केली गेली आहे. पूर्व भारतात झालेली ही पहिली फाईव्ह जी टेस्ट आहे.