ही आहेत जगातील महागडी स्मार्ट वॉचेस
फोनची जागा स्मार्टफोन आणि घड्याळांच्या जागी स्मार्ट वॉच कधी आणि कशी रुळली याचा पत्ता जगाला लागलेला नाही. आता बाजारात आलेली स्मार्टवॉच केवळ वेळ सांगत नाहीत तर इतर अनेक कामे त्याच्या मदतीने पार पाडता येतात. स्मार्टवॉच हा स्टेटस सिम्बॉल बनला आहे आणि त्यामुळे महागडी स्मार्टवॉच बाजारात आली तर नवल नाहीच. जगात सध्या सर्वात महाग असलेल्या स्मार्टवॉचची माहिती आमच्या वाचकांसाठी देत आहोत.
ब्रिक लक्स वॉच ओमनी हे सध्या जगातील सर्वात महागडे स्मार्टवॉच आहे. सुपर लग्झरी कस्टम डिझाईनचे हे अॅपल वॉच १८ कॅरेट गोल्ड व १२ कॅरेट हिरे जडवून बनविले गेले आहे. घड्याळाची केस, पट्टा आणि बटण हिऱ्यांनी जडविले गेले आहेत. या घड्याळाची किंमत आहे १,०९,९९५ डॉलर्स म्हणजे ८१,८२,१२१ रुपये.
सॅमसंग डी ग्रीसगेनो गिअर एस २ हे जगातील दोन नंबरचे महाग स्मार्टवॉच आहे. सॅमसंग आणि स्विस लग्झरी ज्युलरी मेकर ग्रीसगेनो यांनी संयुक्त रित्या ते तयार केले आहे. स्टायलिश लुकचे हे स्मार्टवॉच रोज गोल्ड मध्ये बनविले गेले असून त्यावर १०० काळे पांढरे हिरे आहेत. हे लिमिटेड एडिशन वॉच असून त्याची किंमत आहे १५ हजार डॉलर्स म्हणजे ११,१६,००३ रुपये.
ब्रिटलिंग एक्सोस्पेस बी ५५ या स्मार्टवॉचला एलईडी डिस्प्ले असून टायटेनियम केस ग्लास ग्लेअर प्रुफ कोटिंग क्रिस्टल सफायर दिला गेला आहे. ईमेल, मेसेजेस रीमायंडर सुविधा असून त्याची किंमत आहे ८९०० डॉलर्स म्हणजे ६,६२,०४६. जगातील हे तीन नंबरचे महाग स्मार्टवॉच आहे.