कृषि अधिकाऱ्याची संपत्ती पाहून लाचलुचपत प्रतिंबधक विभागाचे अधिकारीही चक्रावले


बंगळुरु – एका अधिकाऱ्याच्या घरी टाकलेल्या धाडीत लाचलुचपत प्रतिंबधक विभागाला बेहिशोबी मालमत्ता सापडली आहे. जेव्हा अधिकाऱ्याकडे तपासादरम्यान सात किलो सोने सापडले, तेव्हा एसीबी अधिकारीदेखील चक्रावले. कृषी विभागाचे सह-संचालक रुद्रेशप्पा टी एस यांच्याकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याची माहिती एसीबीला मिळाली होती. यानंतर छापा टाकत कारवाई करण्यात आली.

अधिकाऱ्याच्या एकूण सात ठिकाणांवर छापेमारीदरम्यान छापे टाकण्यात आले. सात किलो सोने यावेळी जप्त करण्यात आले. या सोन्याची किंमत जवळपास साडे तीन कोटी आहे. याशिवाय १५ लाखांची रोख रक्कमदेखील सापडली आहे. बुधवारी सकाळी ही छापेमारी करण्यात आली असून यानंतर हा खुलासा झाला. सध्या एसीबीकडून अनेक संस्था आणि अधिकाऱ्यांच्या ठिकाणांवर छापेमारी केली जात आहे. कर्नाटकमधील सर्व जिल्ह्यांमध्ये ही कारवाई केली जात आहे.