पार्ले-जीने आपल्या सर्वात लोकप्रिय ग्लुकोज बिस्टिकाच्या किंमतीमध्ये केली वाढ


मुंबई – सध्या पेट्रोल-डिझेलची दरवाढ स्थिर असली, तरीही इतर गोष्टींच्या किंमती वाढत आहेत. आधीच कोरोनामुळे संकटात सापडलेल्या सर्वसामान्यांना महागाईची झळ बसत आहे. आता त्यातच पार्ले-जी कंपनीनेही बिस्किटांच्या किंमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने हे पाऊल उउत्पादन खर्चामध्ये वाढ झाल्यामुळे चलले आहे. आपल्या प्रोडक्टवर पाच ते 10 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय पार्ले कंपनीने घेतला आहे. मंगळवारी याबाबतची माहिती पार्ले कंपनीच्या एका अधिकाऱ्याने दिली. ते म्हणाले की, मोठ्या प्रमाणात साखर, गहू आणि तेल यासारख्या कच्च्या मालाच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळेच कंपनीने बिस्किटाच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

आता सहा ते सात टक्क्यांनी पार्ले कंपनीचा सर्वात लोकप्रिय ग्लुकोज बिस्किटाची किंमत महागली आहे. त्यासोबतच कंपनीने टोस्ट आणि केकच्या किंमती अनुक्रमे पाच-दहा आणि 7 ते 8 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. बिस्किटांमध्ये पार्ले-जी, हाइड अण्ड सिक आणि क्रॅकजॅक यासारख्या लोकप्रिय बिस्कीटांचा देखील समावेश आहे.

याबाबत पार्ले प्रोडक्टचे वरिष्ठ अधिकारी मयंक शाह म्हणाले की, पाच ते 10 टक्क्यांची वाढ आम्ही किंमतीमध्ये केली आहे. कंपनीने 20 रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे बिस्किट आणि अन्य उत्पादनाच्या किंमती वाढवल्या आहेत. किंमती व्यवस्थित स्थिर ठेवण्यासाठी बिस्किटाच्या पाकिटाचे वजन घटवले आहे. सातत्याने उत्पादन शुल्कांमधील वाढणाऱ्या किंमतीमध्ये वाढ होत आहे. त्याचबरोबर कच्च्या मालाच्या किंमती सातत्याने वाढत आहे. कंपनीला याचा फटका बसत आहे. खाद्यतेलासारख्या साहित्याच्या किंमतीमध्ये गतवर्षीच्या तुलनेत 50-60 टक्क्यांनी वाढल्यामुळे आपल्या प्रोडक्ट्सच्या किंमती वाढवण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. यंदाच्या आर्थिक वर्षातील पार्ले कंपनीकडून करण्यात आलेली ही पहिली वाढ आहे. याआधी जानेवारी-मार्च 2021 या तिमाहीत कंपनीने आपल्या प्रोडक्ट्सच्या किंमती वाढवल्या होत्या. पण ही वाढ 2020-2021 या आर्थिक वर्षातील होती.