गौतम गंभीर यांना जीवे मारण्याची धमकी


नवी दिल्ली – इसिस काश्मीरकडून माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीर यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. गौतम गंभीरला तुला आणि तुझ्या कुटुंबाला संपवून टाकू, अशी धमकी मिळाली आहे. गौतम गंभीरला ई-मेलवर धमकीचे पत्र मिळाले. त्यानंतर गौतम गंभीर आणि कुटुंबाच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे.

दिल्लीचे भाजप खासदार गौतम गंभीर यांना धमकीचा मेल आल्यानंतर गंभीर यांनी तात्काळ दिल्ली पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेत तात्काळ वाढ करण्यात आली आहे. इसिस काश्मीरने गौतम गंभीर यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. गौतम गंभीर यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती मिळताच डीसीपी श्वेता चौहान यांनी तात्काळ तपास प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे. डीसीपी श्वेता चौहान म्हणाल्या की, गौतम गंभीर यांना धमकी मिळाली आहे. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरु आहे. गौतम गंभीर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली आहे.

माजी क्रिकेटपटू आणि विद्यमान भाजप खासदार गौतम गंभीर यांना जीवे मारण्याची धमकी मिळालेला मेलही शेअर करण्यात आला. यामध्ये इसिस काश्मीरच्या नावाने मेल आला आहे. धमकीच्या मेलनंतर गौतम गंभीर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. गौतम गंभीर यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर राजकारणात प्रवेश केला. आपल्या बेधडक वक्तव्यामुळे गौतम गंभीर नेहमीच चर्चेत असतात. प्रसारमाध्यमांत अथवा सोशल मीडियावर गौतम गंभीर आपले मत व्यक्त करत असतात. दहशतवादाविरोधात गौतम गंभीर यांनी परखड मते व्यक्त केल्यामुळेच त्यांना हा धमकीचा मेल आल्याचे बोलले जात आहे.