या देशात मुली वयात आल्या कि बनतात मुलगा

मुले असोत की मुली, वयात येण्याचा काळ त्यांच्यासाठी कठीण आणि नाजूक असतो. आवाज फुटणे, मूड वारंवार बदलणे, शरीरातील बदल, शरीरावर विविध ठिकाणी केस येणे यामुळे अगोदरच हा वयोगट थोडा डिस्टर्ब असतो असे दिसून येते. जगात एक गाव असे आहे जेथे वयात येण्याच्या वयात मुली मुलगा बनतात. डॉमिनिकन रिपब्लिक मधील ला सेलीनास या गावात हा प्रकार घडत असून त्यामागचे कारण शोधण्यात वैज्ञानिकांना अजून तरी यश मिळालेले नाही. या गावातील मुली एका ठराविक वयात आल्या कि जेन्डर चेंज होऊन त्या मुलगा बनतात. स्थानिक लोक यामुळे या गावाला शापित मानतात. यामागचे रहस्य अजून तरी उलगडलेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार या गावातील ९० पैकी एक मुलगी अश्या प्रमाणात हा प्रकार घडतो. मुली १२ वर्षाच्या झाल्या कि त्यांच्या शरीरात बदल घडून पुरुषांचे अवयव तयार होऊ लागतात आणि काही वर्षात त्या पूर्ण पणे मुलगा बनतात. काही अदृश्य शक्ती यामागे असावी असेही गावकरी सांगतात. काही हा पूर्वजांचा शाप मानतात. मुली असताना मुलगा झालेल्या या मुलांना ग्वेदोचे असे म्हटले जाते. या गावात मुलगी जन्माला आली तर कुटुंब दुःखी होते. कारण तिचा पुढे मुलगा होईल अशी भीती त्यांना वाटते. परिणामी या गावात मुलींची संख्या कमी आहे. आसपासची गावे सुद्धा या गावाकडे संशयाने पाहतात.

समुद्रकिनारी वसलेल्या या गावाची लोकसंख्या ६ हजार आहे. जगभरातील संशोधक गावाच्या या समस्येवर संशोधन करत आहेत. डॉक्टर्सच्या म्हणण्यानुसार हा अनुवांशिक आजार असावा. दर ९० मुलींमागे एका मुलीला हा आजार होतो. त्यात मुलगी १२ वर्षाची झाली कि तिचा आवाज फुटतो आणि हळूहळू तिचे मुलग्यात रुपांतर होते.