जेठालालचा ‘तो’ फोटो शेअर केल्यामुळे स्पॅनिश पत्रकाराला झाला फायदा


छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही एक मालिका आहे. गेल्या १३ वर्षांपासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. फक्त आपल्या देशात नाही तर परदेशातही ही मालिका लोकप्रिय आहे. त्यात जेठालाल ही भूमिका तर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते.


जेठालालचा एक फोटो एका स्पॅनिश पत्रकाराने शेअर केल्यानंतर त्याचे चक्क २०० फॉलोअर्स वाढले आहेत. याची माहिती स्वत: पत्रकार David Llada ने दिली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत त्यांनी सांगितले फक्त एकदा जेठालाल विषयी बोललो आणि २०० फॉलोअर्स वाढले.

खरतर आर्मेनियाच्या बुद्धिबळ खेळाडू Levon Aronian ने २१ नोव्हेंबर रोजी जेठालालचा आणि त्याचा प्रिंटेड शर्टमधला फोटो कोलाज करून शेअर केला होता. हा फोटो शेअर करत तो म्हणाला, लोक मला विचारतात की जेव्हा मी खेळतो तेव्हा माझी गर्लफ्रेंड काय करते? माझ्या फोटोंचे मीम्स बनवते आणि काय..? Levon Aronian ची ही पोस्ट स्पॅनिश पत्रकार आणि बुद्धिबळ प्रमोटर David Lladaने त्यांच्या ट्वीट अकाऊंटवरून शेअर केली आहे. त्याचबरोबर त्यांनी हा फोटो शेअर करत कॅप्शन दिले की जेठालाल चांगला दिसतो. फक्त एकदा जेठालाल विषयी ट्विट केल्यानंतर त्यांचे २०० फॉलोअर्स वाढले आहेत. यावरून विचार करा की जेठालालची लोकप्रियता किती आहे.