प्रियंकाने वगळले तिच्या सोशल मीडिया हॅण्डलवरून जोनास आडनाव


बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक देसी गर्ल प्रियंका चोप्रा ही आहे. अमेरिकन गायक नीक जोनसशी प्रियंकाने लग्न केले. प्रियंकाने लग्न केल्यानंतर आपल्या सोशल मीडिया हॅण्डलवरुन नीक जोनसचे आडनाव लावले होते. आपल्या सोशल मीडिया हॅण्डलवरुन जोनास हे तिचे सासरचे आडनाव प्रियंकाने अचानक वगळल्यामुळे आता प्रियंका लवकरच घटस्फोट घेणार का अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. आता प्रियंकानेच यावर केलेल्या एका कमेंटने उत्तर दिले आहे.

पती नीक जोनसच्या एका पोस्टवर प्रियंकाने कमेंट केली आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून नुकताच एक व्हिडीओ नीकने शेअर केला आहे. नीक या व्हिडीओत वर्कआऊट करताना दिसत आहे. घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना प्रियंकाने नीकच्या या व्हिडीओवर कमेंट केली आहे. प्रियंकाने नीकने त्याच्या बॉडीवर फिदा होऊन कमेंट केली आहे. तिच्या या कमेंटने ती आणि नीक विभक्त होत नसल्याचे कळते आहे.

२०१८ मध्ये नीक जोनासशी प्रियंकाने लग्न केले. जयपूरमध्ये त्यांनी लग्न केले. तर त्याच वर्षी मे महिन्यात ते दोघे रिलेशनशिपमध्ये आले होते. दरमम्यान, प्रियंकाला तिची एंगेजमेंट रिंग विकत घेता यावी म्हणून नीकने टिफनी स्टोअर बंद केले होते. हॉलिवूड रिपोर्टच्या मते अंगठीची किंमत ही २ कोटी रुपयांच्या आसपास आहे.