मुंबई एनसीबीने नांदेडमधून जप्त केले 100 किलो अमली पदार्थ, तर तीन जणांना अटक


नांदेड – सोमवारी रात्री मराठवाड्यातील तीन जिल्ह्यात मुंबई एनसीबीच्या पथकाने छापेमारी केली. यामध्ये 100 किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. एनसीबी पथकाने याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. तर अद्याप छापेमारी सुरु असल्याची माहिती मुंबई एनसीबीने दिली आहे. एनसीबीने सोमवारी नांदेडमध्ये अमली पदार्थाची निर्मिती करणाऱ्या का फॅक्टरीचा भांडाफोड केला. एनसीबीने सोमवारी नांदेड, जालना आणि औरंगाबाद शहरात छापेमारी केली. एनसीबीची कारवाई अद्याप सुरु आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई येथील एनसीबीच्या पथकाने सोमवारी नांदेड शहरात एका व्यापारी संकुलावर धाड मारली. या व्यापारी संकुलातील एका जागेतून जवळपास एक क्विंटल अफू जप्त केले आहे. एनसीबीची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. जवळपास पंचवीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. काही दिवसापूर्वी एनसीबीच्या एका पथकाने मांजरम येथे जवळपास आठ कोटी रुपयांचा गांजा पकडला होता. एनसीबीने एकाच वेळी अनेक ठिकाणी धाडी ही मारल्या होत्या.

विशाखापट्टणम येथून आलेला हा गांजा जवळ गावाकडे जात असल्याची माहिती होती. त्यातच सोमवारी माळ टेकडी परिसरात शंकरराव चव्हाण चौकात चौकात असलेल्या एका व्यापारी संकुलात धाड मारली या वेळी जवळपास एक क्विंटल अफू जप्त करण्यात आला आहे. बाजारात 7 ते 12 हजार रुपये किलो या दराने अफू विक्री होते. काल रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. अफू विक्रीवर प्रतिबंध असून नांदेडमध्ये काहीजण बनावट आणि जुन्या परवान्याच्या आधारावर अफू विक्रीचा व्यवसाय करत असल्याची माहिती आहे.

मुंबई एनसीबीच्या पथकाने नांदेड शहरातील माळटेकडी परिसरातील डोडा भुकटी अंमली पदार्थ कारखान्यावर धाड टाकून मोठ्या प्रमाणात डोडा भुकटी पावडर हस्तगत केल्याचीही माहिती मिळाली आहे. डोडा भुकटी अंमली पदार्थ कारखान्याचा पर्दाफाश करत व मुद्देमाल जप्त करत एनसीबीने ह्या कारखान्यास सील ठोकले आहे. याठिकाणी मुंबई एनसीबी पथकाला रस्त्या लगत असणाऱ्या एका हॉटेल पाठीमागे हा डोडा कारखाना चालत होता. एनसीबी मुंबईच्या या पथकास या कारखान्यातून मोठ्या प्रमाणात पोत्यामध्ये भरलेला डोडा व भुकटी अंमली पदार्थ ताब्यात घेऊन सील करण्यात आले आहे. समीर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली व सुधाकर शिंदे यांच्या नेतृत्वात या अगोदर एनसीबी मुंबईच्या चार अधिकारी असणाऱ्या या पथकाने नायगाव येथील मांजरम येथे मोठ्या प्रमाणात गांजा कार्यवाही केली होती. याच पथकाने आज नांदेडात कार्यवाही करत तीन जणांना ताब्यात घेत, डोडा भुकटी अमली पदार्थ कारखाना सील केला आहे.