फेरारीची ‘दिल खल्लास’ डेटोना एसपी ३ सादर

अतिशय वेगवान आणि शानदार कार बनविणाऱ्या फेरारीने त्यांची नवी स्पोर्ट्स कार डेटोना एसपी ३ सादर केली असून जगभरतील फेरारी प्रेमीसाठी ही ‘दिल खल्लास’ कार बनली आहे. या कारचा प्रचंड वेग होश उडविणारा आहे असा दावा केला जात आहे.

या कारसाठी ८२८ हॉर्स पॉवर क्षमतेचे ६.५ लिटर नॅचरल एस्पिरेटेड व्ही १२ इंजिन दिले असून त्यामुळे ही सुपरकार आकर्षणाचे केंद्र ठरली आहे. फेरारीने आत्ता पर्यंत दिलेले हे सर्वात दमदार इंजिन असल्याचे सांगितले जात आहे. कार डिझाईन अतिशय आकर्षक आणि देखणे आहे. ही सुपर कार २.८ सेकंदात ० ते १०० तर ० ते २०० चा वेग ७.४ सेकंदात घेते. तिचा सर्वाधिक वेग आहे ताशी २११ किमी. कारची केबिन सुद्धा अतिशय लग्झरी आणि आरामदायी असून फिक्स्ड सीट्स आहेत.

कारचा पुढचा भाग डौलदार आहे, एरोडायनामिक्स दिले गेले आहे. कारची किंमत जाहीर झालेली नाही. ही लिमिटेड एडिशन कार असेल असे संकेत मिळत आहेत. अर्थात त्यामुळे तिची किंमत अधिक असेल असेही सांगितले जात आहे. कंपनीकडून या बाबत अधिकृत खुलासा केला गेलेला नाही.