‘या’ दिवशी रिलीज होणार शाहिद कपूरचा जर्सी


बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक अभिनेता शाहिद कपूर हा आहे. शाहिदचे लाखो चाहते आहेत. त्याचे चाहते गेल्या वर्षभरापासून त्याच्या आगामी चित्रपट पाहण्यासाठी आतुर आहेत. शाहिदने त्यात त्याच्या चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला आहे. त्याचा आगामी चित्रपट लवकरच रिलीज होणार असल्याचे त्याने सांगितले आहे.


आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शाहिदने जर्सी या त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. शाहिद या पोस्टरमध्ये एका क्रिकेटरच्या रुपात दिसत आहे. हे पोस्टर शेअर करत “वेळ आली आहे! ही भावना तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी आम्ही गेल्या २ वर्षांपासून प्रतिक्षा करत आहोत. ही भूमिका खास आहे, ही कथा खास आहे, ही टीम खास आहे आणि आम्हाला हे सगळे तुमच्यासोबत मोठ्या पडद्यावर शेअर करायला नक्कीच आवडेल. मला आशा आहे की ती भूमिका साकारताना मला काय वाटले, ते तुम्हाला वाटेल, असे कॅप्शन शाहिदने पोस्टरला दिले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर उद्या म्हणजे २३ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ५.३० वाजता रिलीज करण्यात येणार आहे. तर चित्रपट ३१ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.

शाहिद ‘कबीर सिंग’नंतर हा दुसरा तेलुगू चित्रपटाच्या रिमेकमध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. तेलुगू चित्रपटाचा ‘जर्सी’ हा एका हिंदी रिमेक आहे. जर्सीच्या तेलुगू चित्रपटाचे दिग्दर्शक गौतम तिन्नानुरी हेच हिंदी रिमेकचे दिग्दर्शन करणार आहेत. तेलुगू चित्रपटात नानी आणि श्रद्धा श्रीनाथ ही जोडी मुख्य भूमिकेत होती. तर हिंदीच शाहिदसोबत मृणाल ठाकूर मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटासाठी शाहिदने ३५ कोटी रुपये मानधन घेतल्याचे म्हटले जात आहे.