लष्कराच्या पठाणकोटमधील तळाला पुन्हा लक्ष करण्याचा प्रयत्न


पठाणकोट – ग्रेनेड हल्ला पंजाबमधील पठाणकोटमध्ये लष्कराच्या छावणीच्या गेटवर करण्यात आला आहे. दुचाकीस्वारांनी छावणीच्या त्रिवेणी गेटवर ग्रेनेड फेकले. या घटनेनंतर पठाणकोटच्या सर्व भागात अलर्ट जारी करण्यात आला आहे. सध्या सीसीटीव्ही फुटेज तपासून हल्लेखोरांची ओळख पटवली जात आहे. प्रथमदर्शनी ग्रेनेडचा स्फोट झाल्याचे वाटत आहे. पुढील तपास सुरू आहे. एक मोटारसायकल निघून गेली, त्याचवेळी स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. सीसीटीव्ही फुटेज मिळण्याची आम्हाला आशा असल्याचे पठाणकोटचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक सुरेंद्र लांबा यांनी सांगितले.

दुचाकीस्वारांनी रविवारी रात्री उशिरा पठाणकोटच्या काथवाला पुलावरून धीराकडे जाणाऱ्या लष्कराच्या त्रिवेणी गेटवर ग्रेनेड फेकल्यामुळे मोठा स्फोट झाला. पण, गेटवर असलेले जवान काही अंतरावर होते. त्यामुळे कोणालाही दुखापत झाली नाही. ग्रेनेड फेकणारे दुचाकीस्वार कुठून आले आणि कुठे गेले, हे लष्करी अधिकारीही सांगू शकले नाहीत. पोलीस अधिकारी स्फोटाची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधीक्षक स्वतः पोहोचले आणि परिस्थितीचा आढावा घेतला. आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासत आहेत. संपूर्ण जिल्ह्यात पोलिसांकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाक्यांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

भारतातील सर्वात महत्त्वाच्या लष्कराच्या तळांपैकी एक पठाणकोट हे आहे. हवाई दलाचे स्टेशन, लष्करी दारूगोळा आणि दोन आर्मर्ड ब्रिगेड आणि आर्मर्ड युनिट्स त्यात आहेत. यापूर्वी पठाणकोट हवाईदलाच्या तळावर जानेवारी २०१६ मध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. मोठ्या प्रमाणात दारूगोळा असलेल्या दहशतवाद्यांनी पठाणकोट हवाईदलाच्या तळावर हल्ला केला होता. या हल्ल्यात पाच दहशतवादी ठार झाले होते, तर लष्कराचे आठ जवान शहीद झाले होते.