भारतीयांनी पासवर्ड म्हणून वापरला सर्वाधिक कोणता शब्द ?


सध्या अनेक लोक नेटबँकिंग, ई-मेल, ऑनलाइन पेमेंट अॅप इत्यादी गोष्टींचा वापर करत आहेत. पासवर्डचा वापर या सर्व गोष्टींच्या सुरक्षेसाठी केला जातो. यूझर्सची वैयक्तिक माहिती पासवर्डमुळे सुरक्षित राहते. अनेक एक्सपर्ट लक्षात राहिल असा पासवर्ड ठेवण्याचा सल्ला देतात. NordPass यांनी नुकताच आपला रिपोर्ट जाहिर केला आहे. या रिपोर्टनुसार भारतातील अनेक लोक या शब्दांचा वापर पासवर्ड ठेवण्यासाठी करतात असे लक्षात आले आहे.

नॉर्डपास यांच्या सर्वेक्षणानुसार आपल्या देशामध्ये पासवर्ड ठेवण्यासाठी ‘Password’ या शब्दाचा वापर लोक सर्वाधिक करतात. केवळ आपल्या देशातच नव्हे, तर जगभरातच हा शब्द लोक पासवर्ड म्हणून ठेवतात. तसेच भारतातील अनेक लोक त्यांच्या नावाचा किंवा त्यांच्या जोडीदाराच्या नावाचा वापर पासर्वड ठेवण्यासाठी करतात. नॉर्डपास यांच्या सर्वेक्षणानुसार भारतामध्ये iloveyou, Krishna, sairam आणि omsairam या शब्दांचा पासवर्ड ठेवणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. तसेच भारतात, 123456789, 12345678, india123, qwerty, abc123, xxx, indya123, 1qaz@WSX, 123123 आणि abcd1234 Qj 1qaz या संख्यांचा सर्वाधिक वापर पासवर्ड सेट करण्यासाठी केला जातो.

नॉर्डपास यांच्या सर्वेक्षणामध्ये असे सांगण्यात आले आहे की, QWERTY या शब्दाचा वापर जगात पासवर्ड म्हणून सर्वाधिक केला जातो. तसेच 50 पैकी 43 देशांमधील लोकांनी ‘123456’ या पासवर्डला पसंती दिली आहे.

अशा सुरक्षित ठेवाल आपला पासवर्ड

  • ठराविक काळाने आपला पासवर्ड बदलत राहा.
  • एकच पासवर्ड कधीही सर्व अकाऊंटसाठी वापरु नका, बँकिंग पासवर्ड किंवा ट्रेडिंग अकाऊंचा पासवर्ड बनवण्यासाठी विविध नंबरचा उपयोग करा
  • तुमचा पासवर्ड मोठा असू द्या. पासवर्डमध्ये किमान आठ कॅरेक्टर अवश्य द्या.