धक्कादायक! सोशल मीडियावर व्हायरल झाला महिला आमदाराचा अश्लील व्हिडीओ


इस्लामाबाद – सोशल मीडियावर पाकिस्तानमधील एका महिला आमदाराचा कथित अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला असून एका व्यक्तीला हा व्हिडीओ व्हायरल केल्या प्रकरणी आणि धमकावल्याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे. सानिया आशिक असे ज्या महिला आमदाराचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, तिचे नाव आहे. सानिया यांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे.

पाकिस्तानमधील एआरव्हाय या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानच्या मुस्लीम लीग नवाजच्या सानिया आशिक सदस्य आहेत. पंजाब प्रांतातील तक्षशिला येथील त्या आमदार आहेत. नुकताच पाकिस्तानमध्ये एक अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हायरल व्हिडीओ एका रुममध्ये शूट करण्यात आला आहे. यामध्ये एक महिला नग्नावस्थेत दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ही महिला आमदारच असल्याचा दावा केला जात आहे. हा व्हिडीओ या महिला आमदाराच्या नावानेच व्हायरल होत आहे. हे प्रकरण लक्षात आल्यानंतर सानिया यांनी पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार नोंदवली.


यापूर्वी २६ ऑक्टोबर रोजी सानिया यांनी तपास यंत्रणांकडे टीक-टॉक आणि अन्य सोशल नेटवर्किंग व्हायरल झालेल्या एका व्हिडीओ संदर्भात एका अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर या प्रकरणाचा तपास सायबर विभागाकडे सोपवण्यात आला. तपासादरम्यान हा व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी बुधवारी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. सध्या आरोपीच्या विरोधात वेगवगेळ्या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टीक-टॉकवर त्याने माझे व्हिडीओ व्हायरल करण्याबरोबरच सोशल मीडियावर फोटोही शेअर केले आहेत. व्हिडीओत दिसणारी महिला माझ्यासारखी दिसते, असा दावा सानिया यांनी एका ट्विटमधून यापूर्वीच स्पष्टीकरण देताना केलेला. धमकावणारे शेकडो कॉल, टीक-टॉकवरील अश्लील गाणी, फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट आणि माझ्याशी संबंधित कोणतेही व्हिडीओ व्हायरल करुन माझी प्रतिमा खराब करण्याचे काम केले जात असल्याचा आरोप सानिया यांनी केला आहे.

माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची मुलगी आणि पीएमएल-एनच्या प्रमुख नेत्या मरियम नवाज यांच्या सानिया या निकटवर्तीय आहेत. सानिया या पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर अनेकदा वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन टीका करताना दिसतात. सध्या मात्र त्या नको त्या कारणासाठी चर्चेत आहेत.