चंद्रकांत पाटलांसाठी एखादी शोकसभा घेऊ आणि शोक व्यक्त करू – संजय राऊत


मुंबई – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या कृषी कायदे मागे घेतल्यानंतरच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली आहे. शतेकरी स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत आहेत, तो शोक, दुःख चंद्रकांत पाटलांना वाटत असेल, तर त्यांची मानसिकता तपासावी लागेल. त्यांना मी शोकसंदेश पाठवतो. आपण त्यांच्यासाठी शोकसभा घेऊ, अशी टीका संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत केली.

संजय राऊत म्हणाले, आता चंद्रकांत पाटलांनी मी शोकसंदेश पाठवतो. त्यांच्यासाठी कृषी कायदे मागे घेणे, ही दुःखद घटना असेल, तर आपण त्यांच्यासाठी एखादी शोकसभा घेऊ आणि शोक व्यक्त करू. ज्या देशात आज शेतकरी स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत आहेत, तो जर कुणाला शोक वाटत असेल, दुःख वाटत असेल तर त्यांची मानसिकता तपासावी लागेल.

मी हा निर्णय देशातील अशांतता संपवण्यासाठी घेत असल्याचे मोदींनी सांगितले. मोदींना मी विनंती करेन की पुन्हा एकदा सर्वांना समजावून सांगून हे शेतकऱ्याच्या हिताचे कायदे देशात पुन्हा आणले पाहिजे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते.