स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्कात महाराष्ट्र सरकारकडून ५० टक्क्यांची कपात


मुंबई – आयात केलेल्या स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्क इतर राज्यांच्या बरोबरीने आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ५० टक्क्यांनी कमी केले असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितले. तसेच गुरुवारी यासंदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आल्याचेही अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

आयात केलेल्या स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्क, खर्चाच्या ३०० टक्क्यांवरून १५० टक्क्यांवर आणण्यात आले आहे,” असे अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले. अधिकाऱ्याने सांगितले की, आयात केलेल्या स्कॉचच्या विक्रीतून महाराष्ट्र सरकारला वर्षाला १०० कोटी रुपयांचा महसूल मिळतो. या कपातीमुळे सरकारचा महसूल २५० कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे, यामुळे एक लाख बाटल्यांवरून २.५ लाख बाटल्यांची विक्री वाढेल.