कतरिना विवाहानंतर बदलणार आडनाव

सूर्यवंशी चित्रपटाला रसिकांकडून मिळत असलेल्या प्रतिसादाने कतरिना कैफ आनंदात आहे. सध्या कतरिनाचे चांगले दिवस आहेत. त्यातच कतरिना आणि विक्की कौशल यांच्या विवाहाची गडबड सुरु झाली आहे. या दोघांनी अधिकृतपणे विवाहा संबंधी काही घोषणा केलेली नसली तरी बी टाऊन मध्ये या विवाहाची जोरदार चर्चा सुरु आहे.

बॉलीवूड लाईफ मधील बातमीनुसार कतरिना विवाहानंतर तिचे आडनाव बदलणार आहे. तिच्या नावात कौशल आडनाव जोडले जाईल असे समजते. अर्थात लग्नानंतर आडनाव बदलणारी कतरिना ही पहिली अभिनेत्री नाही. तिच्याच बरोबरच्या प्रियांका चोप्रा, करीना कपूर, सोनम यांनीही त्यांच्या आडनावात सासरचे नाव जोडले आहे. कतरिनाने खरेच आडनाव बदलले तर टायगर ३ च्या क्रेडीट रोल मध्ये कॅटरीना कैफ कौशल असे नाव दिसू शकेल असे सांगितले जात आहे.

कतरिना आणि विक्की राजस्थान मधील सवाई माधोपुर मधील सिक्स सेसेस फोर्ट बरवाडा हॉटेल मध्ये विवाहबद्ध होत असून हा सोहळा ७ ते १२ डिसेंबर दरम्यान होणार आहे. या सोहळ्याची निमंत्रण यादी तयार झाली असून अनेक बॉलीवूड सेलेब्रिटी उपस्थिती लावणार आहेत असे समजते.