नव्या वर्षात केंद्रीय कर्मचार्‍यांना देणार मोदी सरकार पुन्हा पगारवाढीचे गिफ्ट?


नवी दिल्ली – केंद्रीय कर्मचार्‍यांना पुन्हा पगारवाढीचे गिफ्ट मोदी सरकारकडून मिळण्याची शक्यता आहे. नव्या वर्षामध्ये अजून एका गिफ्टची कर्मचार्‍यांना मोदी सरकारकडून अपेक्षा आहे. केंद्रीय कर्मचार्‍यांना यंदाच्या दिवाळी पूर्वीच महागाई भत्त्यामध्ये 3% वाढ करून देण्यात आली आहे. आता रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकार हाऊस रेंट अलाऊंस वाढवण्याच्या तयारीमध्ये आहे. जानेवारी 2022 मध्ये केंद्र सरकारी कर्मचार्‍यांना एचआरए वाढवून मिळू शकतो.

11.56 लाख पेक्षा जास्त कर्मचार्‍यांच्या हाऊस रेंट अलाऊंसमध्ये वाढ करण्याची तयारी अर्थमंत्रालय कडून सुरू झाली आहे. रेल्वे बोर्डाकडे देखील सध्या अप्रुव्हलसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर कर्मचार्‍यांना जानेवारी 2022 मध्ये वाढीव एचआरए मिळू शकतो. जानेवारी 2021 पासून वाढीव एचआरए लागू करण्याची मागणी Indian Railway Technical Supervisors Association आणि National Federation of Railwaymen यांच्याकडून जोर धरत असल्यामुळे या निर्णयानंतर केंद्रीय कर्मचार्‍यांच्या पगारात पुन्हा दमदार वाढ होण्याची शक्यता आहे.

50 लाख पेक्षा अधिक ज्या शहराची लोकसंख्या आहे ते शहर ‘X’कॅटेगरीमध्ये येते. 5 लाखापेक्षा अधिक लोकसंख्येचे शहर ‘Y’ कॅटेगरीमध्ये येते, तर 5 लाखापेक्षा कमी लोकसंख्येचे शहर ‘Z’ कॅटेगरीमध्ये येते. या तिन्ही शहरात किमान एचआरए 5400, 3600 आणि 1800 आहे. Department of Expenditure च्या माहितीनुसार, जेव्हा 50% ला डीए पोहचतो, तेव्हा कमाल हाऊस रेंट अलाऊंस हा 30% वाढण्याची गरज असते.