कंगनाच्या ‘त्या’ वक्तव्यावर जावेद अख्तर यांची प्रतिक्रिया


आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे बॉलिवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना राणावत नेहमीच चर्चेत असते. ती बऱ्याचवेळा ट्रोल देखील होते. कंगनाने काही दिवसांपूर्वी १९४७ मध्ये मिळालेले स्वातंत्र्य ही भीक मिळाली असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे कंगनाला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. कंगनाला यावेळी फक्त नेटकरी नाही, तर बॉलिवूड सेलिब्रिटीही ट्रोल करत आहेत. यात बॉलिवूडचे लोकप्रिय गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी ही तिला ट्रोल केले आहे.


कंगनाच्या वक्तव्यावर जावेद यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या ट्विटमध्ये कंगनाचे नाव घेतले नाही, पण त्यांच्या ट्विटमधून हे स्पष्टपणे कळते की हे ट्विट त्यांनी कंगनाच्या वक्तव्यावर केले आहे. ज्यांचा स्वातंत्र्य चळवळीशी काहीही संबंध नव्हता, अशा सगळ्यांना जेव्हा काही लोक आपल्या स्वातंत्र्याला ‘भीक’ म्हटले तर वाईट का वाटते?, असे जावेद अख्तर आपल्या ट्विटमध्ये म्हणाले.