सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून ए. बी. डिव्हिलियर्सने निवृत्ती घेतल्यामुळे भावूक झाली विराट कोहली


नवी दिल्ली – सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा आज दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज आणि आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा सदस्य असणाऱ्या ए. बी. डिव्हिलियर्सने केली आहे. राष्ट्रीय संघामधून मागील तीन वर्षांपासून न खेळलेल्या डिव्हिलियर्सने यापुढे आपण इतर स्पर्धांमध्येही खेळणार नसल्याचे सांगत निवृत्ती जाहीर केली आहे. आरसीबीच्या चाहत्यांना ए. बी. डिव्हिलियर्सच्या या निवृत्तीच्या तडकाफडकी निर्णयामुळे मोठा धक्का बसला आहे. पण त्याचबरोबर नुकताच कर्णधार पदावरुन पाय उतार झालेल्या विराटलाही डिव्हिलियर्सच्या या निर्णयामुळे दु:ख झाले आहे. विराट आणि डिव्हिलियर्सची जोडी ही आयपीएलमधील सर्वात चर्चेतील जोड्यांपैकी एक आहे. पण हे दोघे आता ड्रेसिंग रुम शेअर करणार नाहीत. विराटने डिव्हिलियर्सच्या निवृत्तीसंदर्भात ट्विटरवरुन भावनिक प्रतिक्रिया दिली आहे.


आमच्या काळातील सर्वोत्तम खेळाडूसाठी आणि मी आतापर्यंत भेटलेल्या सर्वात प्रेरणादायी व्यक्तीसाठी… तू जे काही केले आहेस त्याचा तुला फार अभिमान वाटला पाहिजे. भावा आरसीबीला जे काही तू दिले आहे त्यासाठी तुला नक्कीच अभिमान वाटला पाहिजे. आपले नाते हे खेळा पलिकडचे आहे आणि ते कायमच राहिले, असे कोहलीने म्हटले आहे. या निर्णयाचा माझ्या मनाला फार त्रास होतो आहे, पण मला माहिती आहे, तू तुझ्यासाठी आणि तुझ्या कुटुंबासाठी सर्वोत्तम निर्णय घेतला घेतला आहे, जसा तू नेहमीच घेतोस. फार सारे प्रेम, असे विराटने दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

विशेष म्हणजे यावर रिप्लाय करत डिव्हिलियर्सनेही, माझ्याकडून पण तुला फार सारे प्रेम भावा, असे म्हटले आहे.

डिव्हिलियर्स मागील तीन वर्षांपासून त्याच्या राष्ट्रीय संघामधून खेळला नसला,तरी तो आरसीबीसाठी खेळत होता. २०२१ च्या आयपीएलमध्ये तो आरसीबीसाठी १५ सामने खेळला. यामध्ये त्याने ३१.३० च्या सरासरीने ३१३ धावा केल्या. त्याने आता निवृत्तीची घोषणा केल्यामुळे तो आयपीएलही खेळणार नाही. आयपीएलमध्ये त्याने एकूण ५ हजार १६२ धाव केल्या आहेत. तो आयपीएलच्या १८४ सामने खेळा असून त्याची सरासरी ३९.७० एवढी आहे. त्याचा स्ट्राइक रेट १५१.६८ एवढा आहे. या स्पर्धेच्या आतापर्यंतच्या सर्व पर्वांचा विचार केल्यास सर्वाधिक धावा करणाऱ्या अव्वल २० खेळाडूंमध्ये त्याचा समावेश आहे.