कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या 12 बालकांना 5 लाख रुपयांची मुदतठेव प्रमाणपत्र दादाजी भुसे यांच्या हस्ते वितरित


पालघर : जिल्ह्यातील कोविड 19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या अनाथ झालेल्या 12 बालकांच्या बँक खात्यात 5 लाख रुपयांची मुदतठेव ही वयाच्या 21 व्या वर्षी पर्यंत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी पालघर व बालक यांच्या संयुक्त खात्यावर राज्य शासनामार्फेत मुदतठेव ठेवण्यात आली आहे. मृत प्रमाणपत्राचे वाटप पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये करण्यात आले.

कोरोना मुळे अनाथ झालेले बालके व विधवा झालेल्या महिलांना सर्वोतोपरी शासनाकडून मदत करणार असल्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यावेळी सांगितले . जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात कार्यक्रम आयोजित या कार्यक्रमात खासदार राजेंद्र गावित, सर्वश्री आमदार श्रीनिवास वनगा सुनील भुसारा, रवींद्र फाटक जिल्हाधिकारी माणिक गुरसळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिध्दराम सालीमठ, पोलीस अधिक्षक दत्तात्रेय शिंदे, जिल्ह्यातील उपस्थित, तसेच महिला व बाल विकास अधिकारी मल्लीनाथ कांबळे, व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते उपस्थित होते.

कोविड 19 मुळे दोन्ही पालक गमावलेले बालकांना राज्य शासन 5 लाख व केंद्र शासना मार्फत 10 लाख रु असे एकूण 15 लाख रु बालकांच्या संयुक्त खातेमध्ये रक्कम जमा होणार आहे. तसेच एक पालक गमावलेल्या बालकांकरीता माहिला व बाल विकास विभागाच्या बाल संगोपन योजनेचा लाभ म्हणून दर महा रु 1100/- वयाच्या 18 वर्ष पुर्ण होई पर्यंत बाल कल्याण समितीच्या आदेशान्वे दिली जात असल्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले . जिल्हातील अनाथ बालकांना व विधवा महिलांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ तात्काळ देण्यात यावा असे असे निर्देशहि पालकमंत्री दादाजी भुसे यांनी अधिकाऱ्यांना दिले .कार्यक्रमाचे प्रास्तविक जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी पालघर मल्लिनाथ कांबळे यांनी तर सुत्रसंचलन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विनोद राठोड यांनी केले.

आपल्या परिसरातील असलेले एक पालक किंवा दोन्ही पालक कोविड-19 या आजारामुळे दगावलेले असतील तर अशा कुटूंबातील बालकांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ देणे करीता जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय पालघर पत्ता :- मातोश्री बंगला, आर्यन ग्राउंडच्या शेजारी विष्णु नगर रोड, लोकमान्य पाडा, पालघर (प). पिन कोड 409404. या पत्त्यावर संपर्क करण्यात यावा. बालकांच्या कोणत्याही तक्रार, मदत, शासकीय योजनेच्या लाभासाठी 1098 वर संपर्क करावा.