या चिरंजीवांचे वय १ वर्ष  पण कमाई महिना ७५ हजार

एक वर्षाचे मूल पैसे कमाऊ शकेल का आणि किती असा प्रश्न कुणाच्या मनात असेल तर ही बातमी त्यांच्यासाठी आहे. बेबी इंफ्लूएटर म्हणून सोशल मिडीयावर प्रसिद्ध झालेल्या  बेबी ब्रीग्ज्स या केवळ १ वर्षे वयाच्या मुलाची मासिक कमाई ७५ हजार रुपये असून या काळात त्याने ४५ वेळा विमान प्रवास करून अमेरिकेतील १६ राज्यांना भेट दिली आहे. सोशल मिडीयावर या बेबीची कहाणी वेगाने व्हायरल झाली असून त्याचे सर्वत्र कौतुक होते आहे. आत्ताच हे बाळ इतके कमावते आहे मग मोठे झाल्यावर किती कमावेल याचे अंदाज वर्तवले जात आहेत.

बेबी ब्रिग्सने कॅलिफोर्निया, अलास्का, फ्लोरिडा, उटाह सह १६ राज्यात प्रवास केला असून त्याच्या कमाईचे साधन आहे ट्रॅव्हल ब्लॉग. इन्स्टाग्रामवर बेबी ब्रिग्स फेमस असून त्याचे ४२ हजार फॉलोअर्स आहेत. या बेबीची आई त्याच्या जन्मापूर्वी पार्टटाईम्स टुरिस्ट ब्लॉग लिहित होती. तिचे सर्व प्रवास पेड प्रवास असत. म्हणजे त्यासाठी तिला पैसे दिले जात. जेव्हा तिला दिवस राहिले तेव्हा मात्र लहान बाळ आले कि आपले करियर संपणार असे तिला वाटत होते. पण झाले उलटेच. ब्रिग्सच्या जन्मानंतर तिचे करियर अधिक उंचीवर पोहोचले. ब्रिग्सचा जन्म १४ ऑक्टोबर २०२० रोजी झाला असून या बाळाने त्याचा पहिला प्रवास २१ दिवसांचा असताना केला. ब्रिग्सचा एक प्रायोजक आहे. तो त्याला डायपर, वाइप मोफत देतो असेही समजते.