टेनिसस्टार रॉजर फेडरर ने दिले निवृत्तीचे संकेत
जगप्रसिद्ध टेनिस स्टार स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर याने टेनिस मधून निवृत्तीचे संकेत दिले असून त्याचे फेअरवेल टेनिस कोर्टवर व्हावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. टेनिसच्या इतिहासात रॉजर फेडरर, नोवाक जोकोविच आणि राफेल नदाल असे तीनच खेळाडू आहेत ज्यांनी २० पुरुष ग्रँडस्लॅम जिंकली आहेत.
जूनमध्ये झालेल्या विम्बल्डनच्या सुरवातीला रॉजरने १० वर्षापूर्वी पीट सँप्रास बरोबर झालेल्या चर्चेची आठवण काढली. तो म्हणाला तेव्हा मी ३० वर्षाचा होतो आणि पीट ला माझ्याकडे अजून किती वेळ आहे यांची जाणीव करून घ्यायची होती. टेनिस मध्ये बहुतेक खेळाडू ३१ ते ३४ वयात निवृत्ती घेतात. पण मी जसा खेळत होतो, त्यासाठी स्वतःला तयार करणे फार सोपे नव्हते. याच ऑगस्ट मध्ये रॉजरने वयाची ४० वर्षे पूर्ण केली आहेत.
रॉजर म्हणतो इतका काळ खेळू शकेन असे वाटले नव्हते. गुढघ्यावर शस्त्रक्रिया झाल्याने रॉजरने आगामी विम्बल्डन मधून नाव मागे घेतले आहे. येत्या २७ जून पासून या स्पर्धा सुरु होत आहेत. जुलै २०२१ च्या उपउपांत्य फेरीत हरल्यापासून रॉजर टेनिस खेळलेला नाही. १८ महिन्यात त्याच्या गुढघ्यावर तिसरी शस्त्रक्रिया झाली आहे. ऑस्ट्रेलियन ओपन जानेवारी २०२२ पासून सुरु होत असून त्यात रॉजर खेळणार नसल्याचे पूर्वीच जाहीर झाले असून रॉजर निवृत्तीची घोषणा लवकर करेल असे सांगितले जात आहे.