झेडटीईचा जबरदस्त अॅक्सॉन ३० अल्ट्रा स्पेस स्मार्टफोन
झेडटीई त्यांच्या स्मार्टफोन अॅक्सॉन ३० सिरीजचा विस्तार करत असून याच महिन्याच्या २५ तारखेला अॅकसॉन ३० अल्ट्रा स्पेस फ्लॅगशिप मॉडेल सादर करत आहे. या फोनची खासियत म्हणजे या फोन मध्ये मेमरी कंफ्रीगरेशन जगातील सर्व फोन मध्ये आघाडीवर आहे. सोशल मिडिया नेटवर्क वाईबे वर या फोनचा टीझर पेश केला गेला आहे. त्यानुसार अॅकसॉन ३० अल्ट्रा स्पेस एडिशन मध्ये १८ जीबी रॅम व १ टीबी इंटरनल मेमरी दिली गेली आहे. १ टेराबाईट म्हणजे १०२४ जीबी. जगातच कुठल्याच स्मार्टफोन मध्ये इतके इंटरनल स्टोरेज नाही.
सध्या बाजारात असलेले अॅकसॉन ३० अल्ट्रा फोन १६ जीबी आणि १ टीबी इंटरनल स्टोरेजसह आहेत. त्याचे अॅकसॉन ३० अल्ट्रा स्पेस हे अपग्रेडेशन असून त्यात २ जीबी रॅम वाढविली गेली आहे. टीझर पाहून हे फोन लिमिटेड एडिशन असतील असे संकेत मिळत आहेत. या फोनच्या किमतीबाबत अद्याप खुलासा झालेला नाही. फोनची फीचर्स ६.६७ इंची फुल एचडी डिस्प्ले, कोर्निंग गोरील्ला ग्लास ५ प्रोटेक्शन सह आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८८८ चिपसेट सह क्वाड कॅमेरा दिला गेला आहे. विशेष म्हणजे प्रथमच सर्व कॅमेरा सेन्सर ६४ एमपीचे आहेत. प्रायमरी, वाईड अँगल व अल्ट्रा वाईड सर्व सेन्सर ६४ एमपीचे असून ८ एमपीचे टेलीफोटो लेन्स आहे. सेल्फी साठी १६ एमपीचा कॅमेरा असून फास्ट चार्जिंग सपोर्ट करणारी बॅटरी दिली गेली आहे.