VIRAL VIDEO; एमबीबीएस डॉक्टरने शेण खात म्हटले यात असते जीवनसत्वे


आपल्या आरोग्यासाठी गायीचे दूध किती फायदेशीर आहे, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. कित्येक घरांमध्ये आजही आई-वडील आपल्या मुलांच्या नाश्तामध्ये एक ग्लास दुधाचा सक्तीने समावेश करतात. पण अनेकजणांना गायीचे गोमुत्र सुद्धा पिताना तुम्ही पाहिले असेल. पण, गायीच शेण सुद्धा आरोग्यसाठी चांगले असते, असे जर तुम्हाला कुणी सांगितले तर…? हे ऐकूनच तुम्हाला किळस येईल. पण सध्या सोशल मीडियावर याचाच एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. एका एमबीबीएस डॉक्टरने या व्हायरल व्हिडीओमध्ये चक्क शेण खाल्ले आहे. माणसाचे मन, शरीर आणि आत्मा गायीच्या शेणाने शुद्ध होतो, असा दावा या डॉक्टरने व्हायरल व्हिडीओमध्ये केला आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागला आहे. त्यानंतर गायीचे शेण खाणाऱ्या डॉक्टर बराच चर्चेत आला आहे. मनोज मित्तल असे या व्हायरल व्हिडीओमधील डॉक्टरचे नाव असून तो हरियाणातील कर्नालमध्ये राहणारा आहे. तो एमबीबीएस असून त्याचे मोठे हॉस्पिटल देखील आहे. तो एक बालरोग तज्ज्ञ असून गायीचे शेण आणि गोमुत्राचे सेवन केल्यामुळे कोणताच आजार होत नसल्याचा दावा त्याने केला आहे. तो स्वतः या व्हिडीओमध्ये कॅमेऱ्यासमोर सर्वांना गायीचे शेण खात असल्याचे दाखवत आहेत. त्यानंतर तो याचे होणारे फायदे लोकांना सांगताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही विचार करत असाल की, या डॉक्टरने केवळ कॅमेऱ्यासमोर दाखवण्यासाठी तर गायीचे शेण खाल्ले नसेल ना…तर हा एमबीबीएस डॉक्टर आता नव्हे, तर गेल्या अनेक वर्षापासून शेण खात आहे. शेणामध्ये व्हिटॅमिन बी १२ असते असे या डॉक्टरचे म्हणणे आहे. माणसाचा रेडिएशनपासून शेणामुळे बचाव होतो, असे देखील या डॉक्टरांनी म्हटले आहे.


28 टक्के ऑक्सिजन गायीच्या शेणात असतो. त्यामुळे शेणाच्या सेवनाने शरीरात थंडावा निर्माण होतो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, आजपर्यंत कधीच एसी किंवा पंख्याचा वापर डॉक्टर मित्तल यांनी केला नाही. तर आतापर्यंत ते फक्त फरशीवर झोपतात. आपल्या आजुबाजुला असलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमधून बाहेर पडणाऱ्या रेडिएशनचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. या रेडिएशनपासून गायीचे शेण माणसाच्या शरीराचा बचाव करतो, असे देखील डॉक्टर या व्हिडीओमध्ये सांगत आहे.

मला भाऊ-बहिण आहेत आणि प्रत्येक जणांचा नैसर्गिक प्रसुतीने जन्म झाला. कुणालाच ऑपरेशनची करण्याची वेळ आली नाही. कारण त्याची आई गायीचे शेण खात होत्या, असे कॅप्शनमध्ये लिहित हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. भारताकडे ‘गायीचे शेण’ ही सगळ्यात शक्तीशाली गोष्ट असल्याचे देखील या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. Shahnawaz Ansari या सोशल मीडिया युजरने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर शेण खाणाऱ्या या डॉक्टरचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल लागला आहे.

या डॉक्टरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी आपआपली मते शेअर करण्यास सुरूवात केली आहे. त्यांनी केलेल्या दाव्यावरून डॉक्टर मित्तल यांच्या पदवीबाबत शंका निर्माण करण्यात येत आहे. काही युजर्सनी डॉक्टरच्या दाव्याला पाठिंबा दिला आहे. तर काही युजर्सनी वाद-विवादाला सुरूवात केली आहे. गायीचे शेण खाल्ल्यामुळे खरंच शरीराला फायदा होतो का, असा प्रश्न विचारताना दिसून येत आहेत. आतापर्यंत या व्हिडीओला ३५ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.