मुंबईतील पवईच्या हुंडाई सर्व्हिस सेंटरला भीषण आग; कोट्यवधींच्या गाड्या जळून खाक


मुंबई – काही वेळापूर्वी पवईच्या साकी विहार रोडवर लार्सन एंड टूब्रो कंपनीच्या समोर साई ऑटो हुंडाईच्या सर्व्हिस सेंटरला भीषण आग लागल्यामुळे बाजूच्या महावीर क्लासिक या इमारतीत राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या पवई पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि वाहतूक विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. या आगीमुळे आणि नागरिकांच्या प्रचंड गर्दीमुळे वाहतूक कोंडी होऊन मदत कार्याला उशीर होत आहे. शोरूम मधून मोठे मोठ्या स्फोटाचे आवाज होत आहेत. तर कोट्यवधींच्या गाड्या या शोरूममध्ये असून त्या जळून खाक झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मुंबईतील पवई येथील साकी विहार रोडवरील लार्सन अँड टुब्रो कंपनी समोर असलेल्या साई ऑटो हुंडाईच्या सर्व्हिस सेंटरला आग लागली आहे. सभोवतालच्या परिसरात आगीमुळे धुरांचे लोळ पसरले आहेत. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरु आहेत. सर्व्हिस सेंटरच्या बाजूलाच असलेल्या महावीर क्लासिक इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांमध्ये आगीमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. आगीच्या ठिकाणावरुन स्फोटाचे मोठे आवाज येत आहेत. या ठिकाणी सुरु असलेल्या मदत आणि बचावकार्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली असून आगीत कोट्यवधीच्या गाड्या जळून खाक झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान आगीची माहिती मिळताच घटनास्थळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरही पोहोचत असून त्या परिस्थितीचा आढावा घेतील. दरम्यान, आगीत अद्याप किती नुकसान झाले, याची अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.