वयाच्या 46 व्या वर्षी आई झाली प्रीती झिंटा


बॉलिवूडची डिम्पल गर्ल अर्थात अभिनेत्री प्रीती झिंटा वयाच्या 46 व्या वर्षी जुळ्या मुलांची आई झाली आहे. ही गुड न्यूज प्रीतीने सोशल मीडियावर शेअर केली आहे. आज सर्वांना मी अत्यानंदाची बातमी देऊ इच्छिते. जेन आणि मी खूप आनंदी आहोत आणि आमची मने कृतज्ञतेने भरून आले आहे. कारण आमच्या जुळ्या मुलांचे आम्ही कुटुंबात स्वागत करत असल्याचे प्रीतीने या पोस्टमध्ये म्हटले आहे. प्रीतीने तिच्या मुलांची नावेसुद्धा या पोस्टमध्ये सांगितली आहेत. जय आणि जिया अशी दोघांची नावे आहेत. जुळ्यांचा जन्म सरोगसीच्या माध्यमातून झाला आहे. यापैकी एक मुलगा तर एक मुलगी आहे.


तिने पुढे आमच्या आयुष्यातील या नव्या प्रवासाबद्दल आम्ही दोघे खूप उत्सुक आणि आनंदी आहोत. या अविश्वसनीय प्रवासात आमची साथ देणा-या डॉक्टर, परिचारिका आणि आमच्या सरोगेटचे मन:पूर्वक आभार, असे म्हटले आहे. प्रीतीने पाच वर्षांपूर्वी तिच्यापेक्षा 10 वर्षे लहान अमेरिकन बॉयफ्रेन्ड जेन गुडइनफसोबत लग्नगाठ बांधली होती. लॉस एंजिलिसमध्ये दोघांनीही 29 फेब्रुवारी 2016 रोजी हिंदू पद्धतीने लग्न केले होते. प्रीतीने अनेक महिने लग्नाची बातमी लपवून ठेवली होती. सुमारे 6 महिन्यानंतर या लग्नाचे फोटो समोर आले होते. प्रीती व जेन दोघेही सध्या अमेरिकेत राहतात. जेन पेशाने फायनान्शिअल अ‍ॅनालिस्ट आहे.