आशय भावेच्या प्लॅस्टिक कचऱ्यापासून बूटाची निर्मिती करणाऱ्या स्टार्टअपला मदत करण्यास आनंद महिंद्रा तयार


मुंबई – महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा सामाजिक काम करणाऱ्यांच्या अथवा क्रिएटिव्हिटी दाखवणाऱ्यांच्या मदतीला नेहमीच तयार असतात. तुम्ही याची अनेक उदाहरणे पाहिली असतील. आनंद महिंद्रा त्यांच्या याच कार्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. आनंद महिंद्रा आताही आपल्या एका ट्विटमुळे चर्चेत आहेत. एका 23 वर्षीय स्टार्टअप व्यावसायिकाची आयडिया आनंद महिंद्रा यांना आवडली. त्यांनी त्याला मदत करण्याची तयारीही दर्शवली आहे. या मुलाची कंपनी प्लास्टिक बॉटल आणि टाकाऊ बॅगच्या मदतीने बूटाची निर्मिती करते. मंहिंद्रा यांना या 23 वर्षीय मुलाची आयडिया आवडली.

महिंद्रा यांनी ट्विट करत मन की बात केली आहे. आशय भावे असे या 23 वर्षीय मुलाचे नाव आहे. टाकाऊ प्लॅस्टिकवर रिसायकल करुन बूट तयार करण्याची आयडिया आशय भावे याला शिक्षण घेत असताना सूचली होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आशयने लगेच स्टार्टअप सुरु केले. ‘थैली’ असे आशय भावेच्या स्टार्टअपचे नाव आहे. आनंद महिंद्रा आशयच्या या कंपनीची मदत करण्यास तयार आहेत. याबाबतची माहिती त्यांनी ट्विट करत दिली आहे.

आशयची कंपनी वापरेल्या 10 बॅग, 12 प्लॅस्टिक बॉटल आणि रबरापासून सरासरी बूटाच्या जोडीची निर्मिती करते. आशयच्या कंपनीचा प्रत्येक वर्षाला वापरण्यात येणाऱ्या 100 अब्ज प्लॅस्टिक बॅगपासून रिसायकल करण्याचा उद्देश आहे. या प्लॅस्टिक बॅग वर्षाला 1.2 कोटी बॅरेल तेलाचा वापर केला जातो. तसेच यामुळे प्रतिवर्ष एक लाख समुद्रातील जिवांचा मृत्यू होतो.


आशयच्या कंपनीबाबत नॉर्वेचे माजी मंत्री Erik Solheim यांनी सर्वात आधी ट्विट केले होते. आशयच्या ‘थैली’ कंपनीत बूटाची निर्मिती कशी होते, याबाबतचा व्हिडीओ त्यांनी पोस्ट केला होता. त्यांनी त्यासोबत आशयच्या आयडियाचे कौतुकही केले होते. Erik Solheim यांचे ट्विट पाहिल्यानंतर आनंद महिंद्रा यांनी आपल्याला याबाबत माहित नसल्यामुळे सर्वात आधी खेद व्यक्त केला. तसेच ते म्हणाले की, अशा स्टार्टअपला आपण प्रोत्साहन देण्याची गरज आहे. आशयच्या कंपनीचे बूट खरेदी करण्याचा निर्णय आनंद महिंद्रा यांनी घेतला. त्याशिवाय, स्टार्टअपला आर्थिक मदतही करण्यास तयार झाले आहे.

जुलै 2021 मध्ये आशयच्या ‘थैली’ स्टार्टअपला सुरुवात झाली. बूटाची एक जोडी तयार करण्यासाठी 10 वापरलेल्या बॅग, 12 प्लॅस्टिक बॉटलचा वापर करते. प्लॅस्टिक बॅगला अतिप्रमाणात तापवून ThaelyTex या फॅब्रिकमध्ये रुपांतर केले जाते. त्यानंतर याला बूटाच्या मापाने कापले जाते. तसेच फॅब्रिकमध्ये रुपांतर कलेल्या प्लॅस्टिक बॉटलला rPET (Polyethylene Terephthalate) असे नाव देण्यात आले आहे. याचा वापर लायनिंग, शू-लेस, पॅकेजिंग आणि अन्य भागासाठी वापर केला जातो. बूटाची लेस रिसायकल रबराची असते. या बूटाची किंमत 10 डॉलर एवढी असते.