शाओमी मिनी स्मार्टफोन आणण्याच्या तयारीत

शाओमी अॅपल प्रमाणेच मिनी स्मार्ट फोन आणण्याच्या तयारीत असल्याचे लिक्स काही वेबसाईटवर आले आहेत. हे फोन पुढच्या वर्षात लाँच होतील असे गीझ्मो चायनाचे म्हणणे आहे. आयफोन १३ मिनी प्रमाणे शाओमी कॉम्पॅक्ट स्मार्टफोनवर अगोदरपासूनच विचार करत होती आता कदाचित हे मिनी फोन त्यांच्या पोर्टफोलीओ मध्ये समाविष्ट केले जातील असेही यात म्हटले गेले आहे. या दोन फोनची उत्पादन प्रक्रिया सुरु असल्याचे समजते. गीझ्मो चायनाच्या नुसार एल ३ आणि एल ३ ए या कोडनेमने हे फोन स्पॉट केले गेले आहेत.

रेडमी जीएम एलयु वायबेवर सोमवारी छोट्या स्क्रीनच्या स्मार्टफोन संदर्भात संकेत दिले गेले आहेत. मात्र शाओमीने त्या संदर्भात अधिकृत घोषणा केलेली नाही. ट्वीटर युजर मयंक कुमार यांनी शाओमीचे हे मिनी स्मार्टफोन २१ डिसेंबरला चीन मध्ये सादर होणार असल्याचे म्हटले आहे. मयंक यांच्या म्हणण्यानुसार शाओमी १२, प्रो,  अल्ट्रा सोबत शाओमी १२ मिनी सादर केला जाईल.

या फोन साठी ६.२८ इंची फ्लॅट डिस्प्ले असेल आणि तीन व्हेरीयंट, ८ जीबी रॅम, १२८ व २५६ जीबी स्टोरेज, १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज मध्ये ते येतील. क्वाड कॅमेरा सेट मध्ये १०० एमपीचा प्रायमरी, २० एमपी अल्ट्रा वाईड, ५ एक्स ऑप्टीकल झूम आणि २ एक्स पोर्ट्रेट लेन्स असेल. फास्ट चार्जिंग सपोर्ट बॅटरी दिली जाईल. त्यांच्या किंमती भारतीय रुपयात अनुक्रमे ४२ हजार, ४५५०० व ५०१२५ रुपये असतील.