सूर्यवंशी चित्रपटावर भडकली दाऊड इब्राहीमची गर्लफ्रेंड महविश

अक्षयकुमारची प्रमुख भूमिका असलेला सूर्यवंशी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला रसिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र पाकिस्तानी अभिनेत्री आणि डॉन दाऊद इब्राहीम यांची कथित गर्लफ्रेंड महविश हयात हिने मात्र सूर्यवंशी चित्रपटावर सडकून टीका केली आहे. ती म्हणते हा चित्रपट इस्लोमोफोबिया म्हणजे इस्लाम बद्दल भीती पसरविणारा आहे. बुधवारी ट्वीटरवर लिहिताना महविश म्हणते, हॉलीवूड आता बदलत चालले आहे , सीमापार असलेल्यांनी सुद्धा त्यांचे पालन करावे. तुम्ही योग्य दाखवू शकत नसाल तर मुस्लीम कॅरेक्टर दाखविताना निष्पक्ष राहिले पाहिजे. द्वेष पसरविण्यापेक्षा सद्भावनाचे पूल बांधा.

महविश डॉन दाऊदची मैत्रीण असल्याच्या बातम्या यापूर्वीच आल्या आहेत आणि त्यामुळे दाऊद संतप्त झाल्याचेही सांगितले जात आहे. महविश आणि दाऊद यांची मैत्री सार्वजनिक झालीच कशी असा त्याचा प्रश्न आहे. महविश दाऊदपेक्षा २७ वर्षांनी लहान आहे आणि दाऊदचा विकपॉइंट आहे असे सांगितले जाते. गतवर्षापासून हि चर्चा होते आहे. महविशला तमगा ए इम्तियाज या नागरी सन्मानाने गौरविले गेले तेव्हा तिच्या निवडीवर प्रश्नचिन्ह लावले गेले होते. दाऊद एका आयटम साँग मुळे महविशवर फिदा झाला आणि त्याने तिला मोठमोठ्या प्रोजेक्ट मध्ये काम देण्यासाठी मदत केली अशी चर्चा आहे.

महविशला वरील नागरी सन्मान देण्यासंदर्भात कराची मधील एका प्रभावी व्यक्तीचा हात असून त्याचे तहरिक ए इन्साफ पक्षाशी संबंध आहेत असेही आरोप होत असून हि व्यक्ती म्हणजे दाऊद इब्राहीम हाच असल्याचे सांगितले जाते.