या हेल्मेट मुळे आता विसराळूपणाला नाही जागा

वय वाढू लागले की विसराळूपणा वाढू लागतो. आजकाल जगात विसराळूपणा किंवा विस्मरण होण्याची समस्या वेगाने वाढत आहे आणि ही प्रक्रिया नैसर्गिक असल्याने त्याला रामबाण उपाय मिळणे अवघड आहे. पण विस्मरणाच्या विकारात सुधारणा नक्कीच घडविता येईल या या आशेने संशोधन करत असलेल्या लंडनच्या डरहॅम विद्यापीठातील संशोधकांना एक जादुई हेल्मेट बनविण्यात यश आले आहे. ब्रेन झॅपिंग हेल्मेट असे या हेल्मेटचे नाव ठेवले गेले आहे. विस्मरण म्हणजे डीमेंशिया विकारात हे हेल्मेट खूपच फायदेशीर ठरले आहे.

संशोधकांच्या टीम मधील एक डॉ. गॉडल डुगल यांनी दिलेल्या माहितीनुसार हे हेल्मेट घातले की स्मरणाचे नियंत्रण असलेल्या मेंदूच्या नष्ट होत चाललेल्या पेशींची काम करण्याची क्षमता वाढते आणि त्यामुळे विस्मरण कमी होते. या हेल्मेटचा फक्त सहा मिनिटे वापर करायचा आहे. ज्यांना विस्मरण होऊ लागले आहे त्याच्यात  या हेल्मेट वापराने त्वरित फरक दिसून येतो. या हेल्मेटमधील इन्फ्रारेड किरणे मेंदूच्या आतल्या भागापर्यंत परिणाम करतात आणि हानी झालेल्या पेशी दुरुस्त करतात. त्यामुळे स्मरण सुधारते, रक्तपुरवठा सुरळीत होतो आणि परिणामी मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळतो.

या हेल्मेटचा प्रयोग १३ लोकांवर केला गेला असून हेल्मेट पूर्वी आणि हेल्मेट वापरल्यावर अशी निरीक्षणे नोंदविली गेली. या सर्व लोकांची स्मरणशक्ती वाढलेली दिसली असे समजते. डीमेंशिया मध्ये मेंदूतील पेशी वेगाने डॅमेज होऊ लागतात. त्यामुळे विस्मरण होते. हे हेल्मेट डीमेंशिया आजारात गेमचेंजर ठरू शकेल असे म्हटले जात आहे. या हेल्मेटची किंमत साडेसात लाख रुपये आहे मात्र अद्यापि ते बाजारात विक्रीसाठी आलेले नाही.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही