बॉलीवूड हिरोंना मागे टाकेल असा देखणा आहे कटरिनाचा बॉडीगार्ड

बॉलीवूड मधली लोकप्रिय अभिनेत्री कटरीना, विक्की कौशल बरोबर विवाहबंधनाच्या तयारीत बिझी आहे. कटरीनाचे बॉलीवूड मध्ये अनेक चाहते आहेत. कटरीना बरोबर सावली प्रमाणे राहून तिची सुरक्षा सांभाळणारा बॉडीगार्ड दीपक सिंह कटरीनाच्या लग्न गडबडीमुळे चर्चेत आला आहे. दीपक सिंह बॉलीवूड हिरोपेक्षाही स्मार्ट आहे. कुठलाही कार्यक्रम, फंक्शन मध्ये तो कटरीनाच्या सतत जवळ असतो. हा ‘मॅन इन ब्लॅक’ कटरीनाच्या आगे मागे सतत असतो आणि त्यामुळे अनेक फोटोत तो दिसतो. दीपक सिंहचे स्वतःचेही सोशल मिडिया अकौंट आहे आणि त्यावर त्याने कटरीना सोबत अनेक फोटो शेअर केले आहेत. कोण आहे हा दीपक सिंह?

दीपकसिंहची स्वतःची ‘डोम सिक्युरिटीज’ नावाची सुरक्षा एजन्सी असून तो पूर्वी भारतीय सेनेत होता. त्याला क्रिकेटर व्हायचे होते पण तो झाला बॉडीगार्ड. त्याने यापूर्वी क्रिकेटचा भगवान सचिन तेंडूलकर, धकधक गर्ल माधुरी दीक्षित यांच्यासाठी सुद्धा बॉडीगार्ड म्हणून काम केले आहे. सहा फुटापेक्षा अधिक उंचीचा दीपक सिंह सध्या एखाद्या अभेद्य कवचाप्रमाणे कटरीनाची सुरक्षा करतो आहे.

एका मुलाखतीत तो म्हणाला होता, मला बॉडीगार्ड म्हणून तुम्ही वेगळे दिसले पाहिजे याची गरज वाटत नाही. सामान्य सफारी सूट मध्ये तुम्ही बॉडीगार्ड दिसताच. पण आपण ज्यांची सुरक्षा करतो त्या सेलेब्रिटीबरोबर प्रवास करताना तुम्ही प्रेझेन्टेबल असायला हवे. दीपक पत्नी आणि मुलीसह मुंबईत राहतो. दीपक सिंह यालाही अनेक बॉलीवूड चित्रपट ऑफर्स आल्या होत्या पण त्याने त्यात कधीच रस दाखविलेला नाही. कटरीना त्याला त्याच्या कामासाठी वर्षाला १ कोटी रूपये देते असेही समजते. अर्थात हे काम जबाबदारीचे आणि दगदगीचे आहे त्यामुळे हा मेहनताना योग्य असल्याचे मानले जाते.