भागवत कराडांच्या या कामाचे पंतप्रधान मोदींनी केले कौतुक


नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे खासदार भागवत कराड यांना स्थान देण्यात आले होते. मोदीच्या मंत्रिमंडळात भागवत कराड यांच्याकडे अर्थ राज्यमंत्रिपद देण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री असलेले भागवत कराड पेशाने एक डॉक्टर आहेत. केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी विमान प्रवासादरम्यान प्रोटोकॉल बाजूला ठेवत एका व्यक्तीचा जीव वाचवला आहे. त्या प्रवाशासाठी कराड देवदूत ठरले. सर्वच स्तरातून कराडांच्या या कृतीचे कौतुक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भागवत कराड यांचे कौतुक केले आहे. भागवत कराड यांनी सोशल मीडियावर विमानात घडलेला प्रसंग पोस्ट केला आहे. भागवत कराड यांचे इंडिगोनीही ट्विट करत कौतुक केले आहे.

सोमवारी इंडिगोच्या विमानातून भागवत कराड दिल्लीवरुन मुंबईला प्रवास करत होते. त्यावेळी अचानक कराड यांच्या मागील सीटवरील प्रवाशी प्रकृती बिघडली. विमानातील क्रू मेंबर्सने उद्घोषणाकरुन ऑन बोर्ड कोणी डॉक्टर असेल तर मदत करावी, अशी विनंती केली. केंद्रीय मंत्री डॉक्टर कराड यांनी हे ऐकताच लगेच त्या प्रवाशाजवळ जाऊन प्रथमोपचार देत त्याचा जीव वाचवला. भागवत कराड यांनी हा प्रसंग आपल्या फेसबूक पोस्टमध्ये लिहिला आहे. कराडांच्या या कृतीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करत कौतुक केले आहे.

कराड यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे
प्रवास कर्तव्यदक्षतेचा….. !!
काल प्रवासादरम्यान इंडिगो फ्लाइट IndiGo मध्ये 12 A सीट वर बसलेल्या एका प्रवाशाला अचानक गंभीर आरोग्य समस्या उद्भवली व तो कोसळून पडला. मी समोरच्या सीट वर होतो विमानात अचानक कुजबुज सुरु झाली आणि मला कळाले. एका क्षणाचा देखील विलंब न करता, कुठलाही मिनिस्ट्री प्रोटोकॉल विचारात न घेता मी एक डॉक्टर म्हणून त्याला ताबडतोड सुश्रुषा केली. आपल्या अनुभवामुळे जेव्हा एखाद्या गरजूला मदत होते तेव्हा मिळणारे समाधान हे खूप मोठे असते, याची काल परत एकदा अनुभूती घेतली. आपली भारतीय संस्कृती आपल्याला कायमच हे शिकवते. ” एक मेका साह्य करू अवघे धरू सुपंथ ” संतांची हि शिकवन कायम लक्षात ठेवा व मदतीसाठी पुढाकार घ्या.


इंडिगो एअरलाईन्सने ट्विट करत केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी दाखवलेल्य कर्तव्यदक्षतेबाबत त्यांचे कौतुक केले आहे. तसेच गरजेच्यावेळी धावून आल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत.


इंडिगोच्या या ट्वीटला रिप्लाय देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कराड यांचे कौतुक कले आहे. ते मनाने कायमच डॉक्टर आहेत. माझे सहकारी डॉ. भागवत कराड यांनी केलेले काम कौतुकास्पद असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.