शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कृज्ञतापूर्वक अभिवादन


मुंबई – महाराष्ट्राचे जगद्विख्यात नेतृत्व, हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृज्ञतापूर्वक अभिवादन केले आहे.

शिवसेना पक्षसंघटनेच्या माध्यमातून मराठी अस्मिता, महाराष्ट्राचा स्वाभिमान ज्वलंत ठेवणाऱ्या आभाळाएवढ्या उंचीच्या महान नेतृत्वास स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन. अद्वितीय वक्ता, साक्षेपी संपादक, सिद्धहस्त व्यंगचित्रकार, मोठ्या मनाचा दिलदार माणूस, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदरणीय बाळासाहेबांना वंदन केले आहे.