म्हणून गोल पिझा येतो चौकोनी बॉक्स मधून

काही काही गोष्टींमधील विरोधाभास अनेकदा चटकन लक्षात येत नाही. आज अबालवृध्द पिझ्झा या खाद्यपदार्थाचे शौकीन आहेत आणि पिझाची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पोटभरीचा हा चविष्ट मार्ग मोबाईलवर काही नंबर क्लिक केले की अगदी थोड्या वेळात घरात पोहोचतो. फास्टफूड प्रेमींसाठी तर हा सर्वात फेव्हरीट पदार्थ. त्याचा आस्वाद घेण्यासाठी कोणतीही वेळ, कोणताही काळ चालतो. पण आपण कधी असा विचार करतो का, कि पिझा गोल असतो मग तो चौकोनी बॉक्स मधून का पाठवला जातो? पिझा त्रिकोणी तुकडे करून का दिला जातो किंवा पिझा चौकोनी का केला जात नाही?

याची उत्तरे मजेशीर आहेत. पिझा बॉक्स चौकोनी असण्यामागे पिझा हे कारण नाही तर बॉक्स कारण आहे. चौकोनी बॉक्स सहज आणि कमी किमतीत बनतात. ते बनविण्यासाठी कार्डबोर्ड व शीट इतकीच सामग्री लागते. या उलट गोल बॉक्स बनविण्यासाठी एकापेक्षा जास्त पीस लागतात. चौकोनी बॉक्सची साठवण, वाहतूक सोपी जाते कारण शेल्फ मध्येही चौकोनी कोपरे असतात त्यामुळे तेथे हे बॉक्स फिट बसतात.

आता प्रश्न येतो पिझा चौकोनी का बनवत नसावेत? तर त्याचे कारण म्हणजे गोल एकसारखा पसरवता येतो आणि भाजताना चारी बाजूनी समान भाजला जातो. एकीकडे करपला, एकीकडे कच्चा राहिला असा प्रकार गोल आकाराबाबत संभवत नाही. पिझा त्रिकोणी तुकड्यात कापण्यामागे त्याचा गोल आकार कारणीभूत आहे. कारण गोल वस्तूचे समान वाटप करण्यासाठी तो त्रिकोणी आकारात कापणे हाच उत्तम उपाय आहे. अर्थात पिझा प्रचंड मोठा असेल तर तो चौकोनी तुकड्यात सुद्धा कापला जातो तसेच क्वचित कुठे वेगळेपण जपण्यासाठी चौकोनी आकाराचा पिझा सुधा बनविला जातो. पण हे प्रमाण फार कमी आहे.