मुंबईत शाहरुखचा ‘मन्नत’ आणि दुबईत ‘जन्नत’

बॉलीवूड किंग शाहरुख त्याचा मुलगा आर्यन संदर्भातल्या ड्रग प्रकरणामुळे काही काळ त्रासाला होता मात्र यातून बाहेर पडून त्याने पुन्हा त्याच्या चित्रपट शुटींग कामाची सुरवात केली असल्याचे वृत्त आले आहे. आर्यन प्रकरणात पुन्हा एकदा शाहरुखची संपत्ती, त्याचा अलिशान आणि २०० कोटी रुपये किमतीचा ‘मन्नत’ बंगला बराच काळ चर्चेत राहिले. पण शाहरुख नुसता नावाचा किंग नाही तर बॉलीवूड मध्ये त्याने त्याचे नाणे खणखणीत वाजवून दाखविले आहे आणि आपल्या कुटुंबाची गणना खानदानी कुटुंब म्हणून करण्यास चाहत्यांना भाग पाडले आहे हे नाकारता येणार नाही.

शाहरुखची एकूण मालमत्ता, त्याची घरे, त्याच्याकडच्या अलिशान कार्स, त्याची लाईफस्टाईल याची चर्चा नेहमीच होते. मुंबई मध्ये मन्नत, चंद्रावरील जमीन खरेदी करणाऱ्या शाहरुखचे दुबई मध्ये सुद्धा पूर्ण एक बेट मालकीचे आहे. शाहरुख दुबईचा टुरिस्ट ब्रांड अँबेसीडर असून २००७ मधेच त्याला दुबईच्या पाम जुमेरा मध्ये एक अक्खे खासगी बेट गिफ्ट केले गेले होते. तेथे शाहरुखने अलिशान महाल बांधला असून त्याचे नाव आहे ‘ जन्नत’. या बंगल्याची अंतर्गत सजावट गौरी खान हिनेच केली आहे. पाम जुमेरा हा जगातील सर्वात मोठा कृत्रिम बेट समूह आहे.

शाहरुखच्या दुबईतील या घराची किंमत २.८ दशलक्ष डॉलर्स असून १४ हजार चौरस फुट भागात बांधल्या गेलेल्या त्याच्या या बंगल्यात ६ बेडरूम्स, २ गॅरेज, खासगी स्विमिंग पूल व खासगी समुद्र किनारा आहे.