कस्टमने जप्त केलेल्या घड्याळावर हार्दिक पांड्याचे स्पष्टीकरण


मुंबई – : मुंबई कस्टम विभागाने जप्त केलेल्या दोन घड्याळावर भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याने स्पष्टीकरण दिले आहे. युएईतून सोमवारी मुंबईत परतलेल्या हार्दिक पांड्याची दोन घड्याळे मुंबई कस्टम विभागाने जप्त केली होती. या घड्याळाची किंमत पाच कोटी असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या. हार्दिक पांड्या याने यावरुन ट्विट करत स्पष्टीकरण दिले आहे.

आपल्या ट्विटमध्ये हार्दिक पांड्याने म्हटले की, मी स्वत: मुंबई विमानतळावरील सीमाशुल्क कांऊटर गेलो होतो. तिथे सोबत आणलेल्या सामानाची माहिती आणि सीमाशुल्क भरण्यासाठी गेलो होतो. कस्टम विभागाने ताब्यात घेतलेल्या दोन घड्याळांची किंमत सोशल मीडियावर आणि प्रसारमाध्यमांमध्ये पाच कोटी असल्याचे सांगितली जात आहे. या घड्याळाची किंमत 1.5 कोटी रुपये एवढी आहे.


हार्दिक पांड्या यूएईमधून सोमवारी मुंबईत परतला. विमानतळावर पोहचल्यानंतर कस्टम अधिकाऱ्यांनी हार्दिक पांड्याची 5 कोटी रुपयांच्या किंमतीची 2 घड्याळे जप्त केली आहेत. या घड्याळाचे बिल हार्दिक पांड्याकडे नव्हते. तसेच त्याने या घड्याळांची कोणताही माहिती दिली नसल्याचे मुंबई कस्टम विभागाने सांगितले. यूएईमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. भारतीय संघ या स्पर्धेत साखळी स्पर्धेतून बाहेर पडला. भारतीय संघ सोमवारी मायदेशी परतला, त्यावेळी कस्टमला हार्दिक पाड्याकडे तब्बल 5 कोटी रुपये किंमतीची 2 घड्याळे आढळली. परंतु, हार्दिककडे या घड्याळ्यांचे बिल नव्हते. तसेच त्याने या घड्याळ्यांचा कस्टम वस्तूंमध्ये समावेशही केला नसल्यामुळे कस्टमने ही दोन्ही घड्याळे ताब्यात घेतली आहे.

दरम्यान, मायदेशी परतत असताना हार्दिक पांड्याकडे महागडी घड्याळ सापडल्यानंतर सोशल मीडियावर एकच खळबळ माजली आहे. टी-20 विश्वचषकात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या हार्दिक पांड्याकडे ही घड्याळं कशी आली? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर, आतापर्यंत हार्दिक पांड्याला अटक का नाही झाली? असेही नेटकरी म्हणत आहेत.